Aditya Thackeray Viral Video: आदित्य ठाकरे आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचे फार चांगले संबंध आहेत हे आता सर्वश्रुत आहे. आदित्य ठाकरे अनेकदा अभिनेता दिनू मौर्या, अक्षय कुमार यांच्यासह वेगवेगळ्या कार्यक्रमात दिसत असतो. दिशा सालियन प्रकरणात त्यांच्यावर आरोप करतानाही त्यांच्या बॉलिवूडमधील संबंधांचा दाखला देण्यात आला होता. दरम्यान नुकताच आदित्य ठाकरेंचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते एका अभिनेत्रीसोबत दिसत आहेत.
सोशल मीडियावर आदित्य ठाकरेंचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आदित्य ठाकरेंसोबत बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर दिसत आहे. आदित्य ठाकरे आणि भूमी पेडणेकर एकत्र दिसल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. यादरम्यान दोघांसोबत आणखी काहीजणही दिसत आहेत. मुंबईतल La Loca Maria रेस्तराँमध्ये ते एकत्र होते. यानंतर ही लंच डेट होती की, मैत्रीपूर्ण भेट याबद्दल चर्चा सुरु आहे.
भूमी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) च्या यंग ग्लोबल लीडर्स (YGL) समुदायाची सदस्य आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये, ती जिनेव्हा येथे झालेल्या यंग ग्लोबल लीडर्स समिट 2025 मध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय अभिनेत्री बनली. तिच्या सर्व चाहत्यांसाठी हा अभिमानाचा क्षण होता.
'दम लगा के हैशा', 'टॉयलेट: एक प्रेम कथा', 'पती पत्नी और वो' आणि इतर चित्रपटांमधील भूमिकांसाठी भूमी प्रसिद्ध आहे. ती शेवटची नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय शो 'द रॉयल्स' मध्ये दिसली होती, ज्यामध्ये ईशान खट्टरही मुख्य भूमिकेत होता.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.