PhonePe to exit from Maharashtra : एका जाहीरातीमुळे राज्यातलं वातावरण पुन्हा एकदा तापलंय. या जाहिरातीत फोन पेनं (PhonePe) आपलं कार्यालय मुंबईतून कर्नाटकात हलवत असल्याचं म्हंटलंय. हरकती घेण्यासाठी त्यांनी 14 दिवसांची मुदत दिलीय. आधीच वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta-Foxconn) प्रकल्प गुजरातला (Gujrat) गेल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद रंगलाय. त्यात आता फोनपेचं कार्यालयही कर्नाटकात  (Bengaluru, Karnataka) जात असल्यानं सरकारच्या भूमिकेवर अनेक सवाल उपस्थित होतायेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानिमित्तानं राष्ट्रवादीनेही (NCP) सरकारवर टीकेची संधी साधलीय. महाराष्ट्रातील एकेक उद्योग बाहेर जाणं हे राज्याला परवडणारं नाही असं म्हणत फोन पे वरून राष्ट्रवादीनं सरकारला घेरलंय. 


या उद्योगांनी महाराष्ट्र सोडला 
विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये वेदांता-फॉकस्कॉन, रायगडमधील बल्क ड्रग पार्क,  महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र, नागपूर इथलं राष्ट्रीय कामगार शिक्षण मंडळ, जहाज तोडणी उद्योग, पालघरमधील सागरी पोलीस अकादमी, एअर इंडिया मुख्यालय, ट्रेडमार्क पेटंट कार्यालय असे अनेक उद्योग आणि कार्यालयं राज्याबाहेर गेली आहेत. 



एखादा उद्योग, कार्यालय राज्यातून स्थलांतरित होणं म्हणजे भूमीपुत्रांच्या रोजगारावर गदा येण्यासारखंच आहे. आधीच महागाई आणि बेरोजगारीनं जनता त्रासलीय त्यात उद्योग स्थलांतरित होत राहिले तर याचा थेट परिणाम राज्याच्या विकासावर होऊ शकतो.