मुंबई : येत्या दोन वर्षात भारतात सर्वत्र इलेक्ट्रीक बस धावताना दिसतील, असा आशावाद केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. हा सर्वात स्वस्त इंधनाचा पर्याय आहे. यामुळे सहजच लोक हा पर्याय स्वीकारतील, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. गडकरी हे ‘सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगातील ऊर्जा कार्यक्षमता’ या विषयावरील एका राष्ट्रीय परिषदेत बोलत होते. इकोनॉमिक्स टाईम्सने हे वृत्त दिलं आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोल आणि डिझेलला सर्वात स्वस्त पर्याय, ग्रीन पावर म्हणजेच वीजेपासून तयार होणारं इंधन आहे. यामुळे देशात इलेक्ट्रीक वाहतूक वाढणार आहे, यामुळे नवीन वाहन निर्मिती उद्योगाला फायदा देखील होणार आहे. हा स्वस्त पर्याय असल्याने इलेक्ट्रीक वाहन बनवणे बंधनकारक करणे, किंवा पेट्रोल, डिझेलच्या वाहनांवर बंदी आणण्याची गरज नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.


पेट्रोल, डिझेल विरहित वाहने तयार करण्याची डेडलाईन निती आयोगाने दिली होती, त्याला नितीन गडकरींनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. भारतातील ऑटो सेक्टरमध्ये मागील दोन दशकात आलेली ही सर्वात मोठी मंदी आहे. या मंदीचा सामना करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. 


नीती आयोगाने जून महिन्यात, देशातील दुचाकी, तीनचाकी वाहने २०२३ आणि २०१५ पर्यंत पेट्रोल आणि डिझेलविरहित करण्यात यावी, अशी डेडलाईन दिली होती. प्रदूषण रोखणे, तसेच पेट्रोल डिझेलचा वापर कमी करणे हा या मागील उद्देश होता.