मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन Amitabh Bachchan  यांना कोरोना व्हायरसची Coronavirus लागण झाली आहे. त्यांना शनिवारी संध्याकाळी कोविडच्या उपचारासाठी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहीवेळापूर्वीच ही माहिती समोर आली होती. यानंतर अमिताभ बच्चन यांनीही स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरुन या वृत्ताला दुजोरा दिला. अमिताभ बच्चन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मला कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माझे कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आले आहे. मात्र, या चाचण्यांचे निकाल अद्याप यायचे बाकी आहेत. गेल्या १० दिवसांमध्ये माझ्या जवळच्या संपर्कात असलेल्या लोकांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी, अशी विनंती अमिताभ बच्चन यांनी केली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. अमिताभ बच्चन यांना 'गुलाबो सिताबो' हा चित्रपट नुकताच अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला होता. कोरोनामुळे हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही. दरम्यान, अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती'च्या १२ व्या सीझनचे सूत्रसंचालन करणार होते. मे महिन्यात यासाठीच्या ऑडिशन होणार होत्या. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे हा प्रोजेक्ट लांबणीवर पडला होता. दरम्यान, अमिताभ बच्चन यांचा 'चेहरा', 'ब्रह्मास्त्र' आणि 'झुंड' हे चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत.