)
Nikhil Nanda Apartment: मुंबईत घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. दक्षिण मुंबईतील मलाबार हिल, वांद्रे, जुहू येथील अलिशान घरे तर डोळे दिपवणारी आहे. मुंबईतल अनेक मोठ्या उद्योगपतींची व कलाकारांची घरे आहेत. त्यातच येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात घरांचे व्यवहार होताना दिसताहेत. असाच एक कोट्यवधीच्या घरांची डिल मुंबईत झाली आहे. मुंबईत वनबीएचके येईल इतक्या किमतीची चक्क स्टॅम्प ड्युटीच भरण्यात आली आहे. कुठे झाली ही डिल आणि कोणी केली? जाणून घ्या.
एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेडचे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर निखिल नंदा यांनी मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत म्हणजेच जुहू येथे लग्झरी अपार्टमेंट खरेदी केलं आहे. निखिल नंदा हे अमिताभ बच्चन यांचे जावईदेखील आहेत. रिअल इस्टेट रिसर्च कंपनी लायसेस फोरास यांच्या कागदपत्रांनतर या कराराबाबत माहिती मिळाली आहे. हा करार तब्बल 28 कोटी रुपयांत झाला असून या प्रॉपर्टीची खरेदीदारी निखिल नंदा यांची बहिण नताशा नंदा यांनी पॉवर ऑफ अटॉर्नीच्या माध्यमातून पूर्ण केले आहे.
निखिल नंदा यांचे हे नवे आपार्टमेंट रहेजा कॉर्पच्या मेस्त्रो नावाच्या प्रोजेक्टमध्ये आहे. कागदपत्रांवरुन लक्षात येते की हे अपार्टमेंट 3139 वर्ग फुटांचे असून त्याचबरोबर 411 फुटांचे एक टेरेसादेखील आहे. टेरेसाची जागा पकडून घराचा एकूण एरिया 3550 वर्ग फुट इतका आहे. यादरम्यान निखिल नंदा यांना तीन पार्किंग स्लॉटदेखील मिळाले आहेत. 16 ऑक्टोबर 2025 रोजी हा करार झाला असून यासाठी निखिल नंदा यांनी 1.70 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे.
मेस्ट्रो जुहूचा अल्ट्रा लक्झरी प्रकल्प असून 2026अखेरीस हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे येथून दिसणारे दृश्य. येथील रहिवाशांना एकीकडे 300 एकरावर पसरलेले जुहू एअरोड्रम आणि दुसरीकडे अरबी समुद्राचे दृश्य पाहायला मिळणार आहे. मेस्त्रो जुहूच्या एका खास ठिकाणी बांधण्यात आला आहे. याच जागेवर एकेकाळी चित्रपट निर्माते बी.आर चोप्रा यांचा बीआर हाऊस बंगला होता. के. रहेजा कॉर्पने हा बंगला मे 2022मध्ये चोप्रा कुटुंबाकडून खरेदी केला होता.
निखिल नंदा यांचा संबंध थेट कपूर घराण्याशी आहे. त्यांची आई रितु नंदा या राज कपूर यांची मुलगी आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव राजन नंदा आहे. निखिल नंदा यांनी युनिव्हरसिटी ऑफ पेंसेलवेनियाच्या वॉर्टन स्कुलमधून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी फोर स्कुल ऑफ मेनेजमेंटमधून शिक्षण पूर्ण केले. सध्या ते एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेडचे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहे. ही कंपनी ट्रॅक्टर्स आणि शेतीची अवजारे व हत्यारे बनवते. निखिल नंदा यांनी 1997 मध्ये श्वेता नंदा यांच्याशी लग्न केले होते. त्यांना दोन मुलंदेखील आहेत. नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा.
निखिल नंदा यांनी मुंबईतील जुहू येथील 'मेस्त्रो' प्रोजेक्टमधील एक लग्झरी अपार्टमेंट खरेदी केले आहे. ही खरेदी २८ कोटी रुपयांत झाली असून, त्यांची बहिण नताशा नंदा यांनी पॉवर ऑफ अटॉर्नीच्या माध्यमातून करार पूर्ण केला.
ही प्रॉपर्टी जुहूतील 'मेस्त्रो' अल्ट्रा लक्झरी प्रोजेक्टमध्ये आहे. येथून जुहू एअरड्रॉम (३०० एकर) आणि अरबी समुद्राचे नयनरम्य दृश्य दिसते. हा प्रोजेक्ट २०२६ अखेरीस पूर्ण होईल.
अपार्टमेंटचा आकार ३१३९ वर्ग फूट असून, त्यासोबत ४११ वर्ग फूटांचे टेरेस आहे. एकूण एरिया ३५५० वर्ग फूट आहे. यासोबत तीन पार्किंग स्लॉट मिळाले आहेत.