Aryan Khan Gets Bail : आर्यनला जामीन, मन्नतवर जल्लोष! फटाक्यांची आतषबाजी

ड्रग्स प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यन खानला अटक केली होती

Updated: Oct 28, 2021, 07:06 PM IST
Aryan Khan Gets Bail : आर्यनला जामीन, मन्नतवर जल्लोष! फटाक्यांची आतषबाजी

Aryan Khan gets bail : ड्रग्ज केस प्रकरणी गेल्या 25 दिवसांपासून कोठडीत असणाऱ्या शाहरुख खानचा मुलाग आर्यन खान याला अखेर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. आर्यनसह मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंट या दोघांचा जामीनही मंजूर करण्यात आला आहे. आर्यन खानला जामीन मिळाल्याने त्याची दिवाळी मन्नतवर साजरी होणार हे निश्चित झालं आहे. 

पण त्याआधीच शाहरुख खानच्या चाहत्यांनी दिवाळी साजरी केली आहे. शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर चाहत्याकंडून जल्लोष करण्यात आला. बंगल्याबाहेर चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. तसंच 'वेलकम होम प्रिन्स आर्यन' अशी पोस्टर्स हातात घेऊन चाहत्यांनी जल्लोष केला. 

25 दिवसांनंतर जामीन

3 ऑक्टोबरला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुंबई ते गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर छापा टाकला होता. यानंतर आर्यनसह इतर लोकांना अटक करण्यात आली. त्यानंतर गेले 25 दिवस आर्यन खान जेलमध्ये आहे. सलग तीन दिवसांपासून या प्रकरणावर सुनावणी सुरु होती. यादरम्यान विविध मुद्द्यांना अनुसरून युक्तिवाद मांडण्यात आला. ज्यानंतर गुरुवारी उच्च न्यायालयानं दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर जामीन मंजूर केला.