मागच्या 5 वर्षात BEST अपघातात किती नागरिक मृत्यूमुखी? किती मिळाली नुकसान भरपाई?

BEST accidents Death Claim: मागील 5 वर्षात 834 बेस्टचे बस अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

प्रविण दाभोळकर | Updated: Jan 13, 2025, 04:38 PM IST
मागच्या 5 वर्षात BEST अपघातात किती नागरिक मृत्यूमुखी? किती मिळाली नुकसान भरपाई?
बेस्ट अपघात

BEST accidents Death Claim: मागील 5 वर्षात 834 बेस्टचे बस अपघात घडल्याची माहिती देत 88 जीवितहानी झाल्याची कबूली बेस्ट प्रशासनाने दिली आहे. यात मरणांकत आणि जखमी नागरिकांना 42.40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई दिली गेली आहे. तर 14 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे आणि 24 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अशी माहिती बेस्ट प्रशासनाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिली आहे.

Add Zee News as a Preferred Source

अपघात आणि जीवितहानी

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बेस्ट प्रशासनाकडे मागील 5 वर्षात घडलेल्या अपघाताची, जीवितहानी आणि आर्थिक नुकसानभरपाईची माहिती विचारली होती. बेस्टचे वरिष्ठ वाहतुक अधिकारी ईगाल बेंजामिन यांनी अनिल गलगली यांस मागील 5 वर्षांची सविस्तर माहिती दिली.मागील 5 वर्षात 834 बेस्ट बस अपघात झाले असून यात बेस्ट आणि खाजगी कंत्राटदार यांचा समावेश आहे. बेस्टचे 352 अपघात असून यात जीवितहानीची संख्या 51 आहे तर खाजगी कंत्राटदारांकडून करण्यात आलेल्या 482 अपघातात 37 जीवितहानी झाली आहे. वर्ष 2022-23 आणि वर्ष 2023-24 मध्ये सर्वाधिक प्रत्येकी 21 जीवितहानी झाली आहे. 

मृत्यमुखी आणि जखमी

मागील 5 वर्षांत मृत्यमुखी आणि जखमी यांस 42.40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई देण्यात आली असून 494 प्रकरणे होती. यात सर्वाधिक रक्कम ही वर्ष 2022-23 यात देण्यात आली. त्यावर्षी 107 प्रकरणात सर्वाधिक आर्थिक नुकसान भरपाई रक्कम 12.40 कोटी इतकी आहे. वर्ष 2019-20 मध्ये 9.55 कोटी, वर्ष 2020-21 मध्ये 3.44 कोटी, वर्ष 2021-22 मध्ये 9.45 कोटी, वर्ष 2023-24 मध्ये 7.54 कोटी ही आर्थिक नुकसानभरपाईची रक्कम आहे.

कर्मचारी बडतर्फ संख्या 

मागील 5 वर्षांत प्राणातंक अपघातात कर्मचारी बडतर्फ संख्या 12 आहे आणि वैयक्तिक इजा प्रकरणात 2 कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत. वैयक्तिक इजा प्रकरणात 24 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अन्य कारवाईत ताकीद, समज, सक्त ताकीद, वसुली, द्वंद्वतन श्रेणीत कपात अशी कारवाई करण्यात आली आहे.

अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता

ही आकडेवारी बेस्ट प्रशासनाची सुरक्षिततेची जबाबदारी अधोरेखित करते. यावरून प्रशासन आणि कर्मचाऱ्यांकडून अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता स्पष्ट होते, असे अनिल गलगली यांचे म्हणणे आहे.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More