मुंबई : मुंबईत काम करणाऱ्या नोकरदारवर्गासाठी फिरायला जाण्यासाठी जवळचे निसर्गरम्य स्थळ कोणते असा प्रश्न आता अनेकांना पडतोय. त्याचं कारण म्हणजे मान्सूनची झालेली सुरूवात! मुंबईत आणि उपनगरांमध्ये आता हलक्या पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. मुंबईच्या आजुबाजूला असलेल्या सह्याद्रीच्या रांगामध्ये तसेच समुद्र किनारी फिरायला जाण्याची इच्छा प्रत्येकाची असते. परंतू नोकरीमुळे फिरायला जास्त सुट्ट्या मिळत नाही. त्यामुळे आहे त्या किमान सुट्ट्यांमध्ये निसर्गरम्य परिसराचा आनंद लुटन्यासाठी आम्ही तुम्हाला काही चांगले स्थळं सुचवणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. भंडारदरा 



पावसाळ्यात भंडादरा हे पर्यटनासाठी अतिशय सुंदर ठिकाण आहे. या ठिकाणचे धबधबे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध हवा भंडारदऱ्याच्या सौंदर्यात आणखीनच भर घालतात. भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यकांना सुखद अनुभव देतात.


2 . सुर्यमाळ (मोखाड, ठाणे)



ठाणे जिल्ह्यातील सुर्यमाळ हे पर्यटकांसाठी चांगले डेस्टिनेशन ठरू लागले आहे. मुंबईच्या गोंगाटापासून शांत आणि निसर्गाच्या सौंदर्याचा अविष्कार अनुभवण्यासाठी हे स्थळ चांगला पर्याय ठरू शकते.


3. चौल (अलिबाग)



अलिबाग जिल्ह्यातील चौल हे चाफ्याचे गाव म्हणून ओळखले जाते. गावात सर्वदूर बहरलेली चाफ्याची झाडं आहेत. या गावाचे वैशिष्ट म्हणजेच नारळी-पोफळीची झा़डे एकमेंकांमध्ये गुंतलेली आहेत. निसर्गाचं हे अफाट सौंदर्य या गावातच अनुभवण्यास मिळतं. झाडांच्या एकमेकांच्या गुंफल्यामुळे गाव कुशीत लपलेलं वाटतं.  त्यामुळे तुमचा मन अतिशय प्रसन्न होईल.


4. काशिद (अलिबाग)



अलिबाग जिल्ह्यातील समुद्र किनारे हे निसर्गाची देण आहेत. त्यातही काशिदचा समुद्र किनारा म्हणजेच सौंदर्याची खान! जोडप्यांसाठी हा किनारा रोमँटिक वातावरणाची अनुभूती देतो. अथांग महासागराच्या लाटांचा मधूर आवाज तुमच्यात नवं चैतन्य निर्माण करतो.


5. इगतपूरी (नाशिक)



नाशिक जिल्ह्यात अनेक निसर्गरम्य स्थळे आहेत. परंतू त्यातही इगतपूरी हे थंड हवेचं ठिकाण पावसाळ्यात सौंदर्याने नटलेलं असतं. इगतपूरी हे ठिकाण मध्यरेल्वेचं महत्वाचं रेल्वे स्थानक असल्याने तेथे पोहचणं सहज सोपं आहे. 1-2 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये अत्यंत सुखद आणि रोमँटिक वातावरणाचा अनुभव इगतपूरी आपल्याला देऊ शकतं.