ठाण्याहून वसई-विरारला जाणे सोप्पे होणार, घोडबंदर रस्त्यावरील ट्रॅफिकही सुटणार; या पुलामुळं मेट्रोही जवळ येणार

Bhayandarpada Bridge: घोडबंदरवरील भाईंदरपाडा उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न. गुजरात ठाणे आणि वसई-विरारकडे जाणाऱ्या मार्गावर महत्त्वाची जोडणी मिळणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 15, 2025, 01:50 PM IST
ठाण्याहून वसई-विरारला जाणे सोप्पे होणार, घोडबंदर रस्त्यावरील ट्रॅफिकही सुटणार; या पुलामुळं मेट्रोही जवळ येणार
Bhayandarpada Bridge double decker bridge over Vasai creek between Bhayander and Naigaon

Bhayandarpada Bridge: ठाणे शहराच्या वाहतूक दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या भाईंदरपाडा उड्डाणपुल अखेर नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत उड्डाणपुलाचे लोकार्पण पार पाडले आहे. या उड्डाणपुलामुळं नागरिकांचा वेळ वाचणार आहे तसंच, प्रवासदेखील आणखी जलद व आरामशीर होणार आहे. उड्डाणपुलाचे काय आहेत फायदे जाणून घेऊयात. 

Add Zee News as a Preferred Source

उड्डाणपुलाची विशेष बाब म्हणजे तो मेट्रो लाईन 4 व 4A च्या व्हायाडक्टवर उभारण्यात आला आहे, त्यामुळे एकाच जागेचा प्रभावी वापर करून रस्ते आणि मेट्रो यांच्यातील समन्वय साधण्यात आला आहे. भविष्यात मेट्रो सेवा सुरू झाल्यावर या भागातील रहिवाशांना सहजपणे मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचता येणार आहे. या प्रकल्पाद्वारे ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, जेएनपीटी तसेच बोरिवली, वसई-विरार आणि गुजरातकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वाहतूक अधिक सुरळीत आणि जलद होणार आहे.

या प्रकल्पामुळे ठाणे पूर्व, घोडबंदर रोड, गायमुख, कासारवडवली, ब्रह्मांड, वाघबिळ आणि भाईंदरपाडा परिसरातील नागरिकांना प्रत्यक्ष फायदा होणार आहे. दररोजचा प्रवास जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. याशिवाय, या प्रकल्पात स्थानिकांना घोडबंदरच्या डाव्या उजव्या बाजुला जाता यावे म्हणून स्वतंत्र भुयारी मार्ग (Subway) सुद्धा बांधण्यात आला आहे. त्यामुळे वरच्या उड्डाणपुलावरील सामान्य वाहतुकीवरील ताण कमी होईल. परिणामी, गायमुख ते वाघबिळ दरम्यानची वाहतूक कोंडी सुटेल आणि घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक अधिक गतिमान आणि प्रदूषणमुक्त होईल.

घोडबंदर रस्ता हा गुजरात ते जेएनपीटी दरम्यानच्या आंतरराज्यीय जड वाहन वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या मार्गावरच्या गायमुख ते वाघबिळ दरम्यानची वाहतूक कोंडी आता लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. जड वाहने आणि ऑफिस प्रवासी यांच्यामुळे या रस्त्यावर नेहमी ताण असतो, तो आता कमी होईल. उड्डाणपुलामुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन, सरासरी वेग वाढेल.

प्रकल्पाची  वैशिष्ट्ये

- उड्डाणपुलाची एकूण रॅम्प लांबी: 601 मीटर
(ठाणे कडील बाजू - 391.48 मी, भुयारी मार्ग - 20.4 मी, बोरिवली कडील बाजू - 189.88 मी)
- मार्गिका: 2+2 (7.5 मीटर + 7.5 मीटर)
- भुयारी मार्ग: 2 x 2 लेन (लांबी 20.4 मी x रुंदी 19.7 मी)
- वाहन घनता: अंदाजे 73,333 PCU

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More