Biryani & Watermelon Family Death : मुंबईतील पायधूनी परिसरातील एका कुटुंबातील चार जणांनी आधी बिर्याणी खाल्ली आणि नंतर कलिंगड त्यानंतर या चौघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Biryani & Watermelon Family Death : मुंबईतील पायधूनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला हे जाणून घेण्याची उत्सुकता अख्खा देशाला आहे. कारण या कुटुंबातील चौघांनी बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर कलिंगड खाल्लं. त्यानंतर या चौघांची प्रकृती खालावली. पहिले पोट खराब झालं, त्यानंतर उलट्या झाल्यात. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर त्यांच्या मृत्यू झाला. यामुळे कलिंगड - बिर्याणी एकत्र खाल्ल्यामुळे विषबाधा झाली असं प्रथमदर्शींनी सगळ्यांना शंका आली. पण अनेक रिपोर्टनंतर त्यांच्या मृत्यू विषबाधामुळे झालेला नाही. मग त्यांच्या मृत्यूमागे नेमकं कारण काय आहे, याचा शोध अजून सुरु आहे. अशातच एक मोठी अपडेट समोर आली आहे. फोरेन्सिक आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या चर्चेतून असं समोर आलं की, त्यांची प्रकृती खराब झाल्यानंतर वैद्यकीय उपचार मिळण्यात सुमारे साडेपाच तास उशीर झाला.
जे जे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं की, या चौघांची प्रकृती ही रात्री उशिरा खराब झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांना 11 ते 12 च्या सुमारास त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना डॉक्टरांनी प्राथमिक उपचार देऊन काही औषधं दिली. त्यामुळे त्यांना काही वेळासाठी बरंही वाटलं होतं. पण थोड्या वेळानंतर त्यांची प्रकृती खराब झाली आणि त्यांच्या मृत्यू झाला.
डॉक्टरांनी सांगितलं की, वैद्यकीय उपचारामध्ये गोल्डन अवर खूप महत्त्वाचा असतो. प्रकृती बिघडलयानंतर त्यांनी तातडीने रुग्णालयात येऊ उपचार घेणं अपेक्षित होतं. पण ते चौघं घरीच थांबवले. त्यामुळे या चौघांना गोल्डन अवरमध्ये उपचार न झाल्यामुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये गंभीर लक्षणं दिसून आलीत. डॉक्टरांनी सांगितलं की, या चौघांच्या शवविच्छेदनानंतर घेण्यात आलेल्या प्राथमिक नमुन्यांच्या रिपोर्टमध्ये तीव्र स्वरुपाची विषबाधा झाल्याच समोर आलंय. पण अद्याप या चौघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेले नाही.
डॉक्टरांनी सांगितलं की, कदाचित वेळेत उपचार न झाल्यामुळे त्या चौघांचा मृत्यूचं एक कारण असू शकतं. दुसरीकडे त्यांच्या विषशास्त्र अहवालात मॉर्फिन हे विषारी पदार्थ आढळला आहे. त्यांच्या मृत्यू मागे हेदेखील कारण असू शकतं असं तज्ज्ञांना वाटतं. दरम्यान अजून फोरेन्सिक विभाग आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा अंतिम अहवाल अद्याप पोलिसांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे या चौघांचा मृत्यू कशामुळे झाला हे एक गूढ झालं आहे. पोलीस याप्रकरणाची सखोल तपास करत आहेत.