Biryani & Watermelon Family Death : मुंबईतील पायधूनी परिसरातील कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू प्रकरणात धक्कादायक वळण आलंय. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा संबंध एका जुनं प्रकरण जे एका मेकअप आर्टिस्ट महिला आणि बिल्डरशी आहे.

Biryani & Watermelon Family Death : मुंबईतील पायधूनी परिसरात राहणाऱ्या नवरा, बायको आणि दोन मुलींचा एकाच वेळी मृत्यू झाला. बिर्याणी आणि कलिंगड एक खाल्ल्यामुळे हा मृत्यू झाल्याचा प्रथमदर्शीने संशय होता. या घटनेनंतर मुंबईसह महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्या चौघांच्या मृत्यूमागे नेमकं कारण काय आहे, याचा मुंबई पोलीस कसून शोध लावत आहे. काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) चा रिपोर्ट समोर आला. या घटनेशीसंबंधीत 11 पदार्थांची तपासणी करण्यात आली. या रिपोर्टनुसार या 11 पदार्थांमध्ये असं काहीही सापडलं नाही की, ज्यामुळे या चौघांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणाला वेगळं वळण आलंय. कारण पोलिसांच्या सूत्र या प्रकरणात जोरात फिरली असून एका मेकअप आर्टिस्ट महिला आणि बिल्डरशी या प्रकरणाचे कनेक्शन जोडलं जातंय.
पोलिसांच्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलं की, एका जुन्या गुन्हेगारी प्रकरणात मृत अब्दुला डोकाडिया एकमेव महत्त्वाचा साक्षीदार होता. हे प्रकरण मेकअप आर्टिस्ट महिला आणि बिल्डरशी संबंधित आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेकअप आर्टिस्ट महिला आणि बिल्डर हे दोघं नवरा बायको आहे. या मेकअप आर्टिस्ट महिलाने बिल्डर पतीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या दोघांमधील वाद आर्थिक आणि कौटुंबिक असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
मेकअप आर्टिस्ट आणि तक्रारदार हमीदा शेख ही अमेरिकत मेकअप आर्टिस्ट म्हणून व्यवसाय करत होती. तिचा बिल्डर नवरा आफताब हा तिचा दूरचा नातेवाईक होता. त्यांची फेसबुकवर ओळख झाली. खरंतर आफताब हा विवाहित होता. पण त्याने घटस्फोट देऊन हमीदाशी लग्न केलं होतं. लग्नानंतर ती अमेरिकेतील काम सोडून भारतात आली.
आफताबचे वडील रिअर इस्टेटचा व्यवसाय करायचे. त्यांचा हा व्यवहासाय तोट्यात चालत होता. अशात लग्नापूर्वीत 2019 मध्ये आफताबने हमीदाकडे व्यवसायासाठी 50 लाख मागितले होते. पण हमीदाने त्याला 25 लाख दिले. आफताब आणि हमीदाचा हा व्यवहार झाला त्याचा एकमेव साक्षीदार हा अब्दुल्ला डोकाडिया होता. कारण आफताबने अब्दुल्ला डोकाडियाला हमीदाकडे पैसे घेण्यासाठी पाठवलं होतं. हमीदाने या तक्रारीत असाही आरोप केला आहे की, लग्नानंतर आफताबने 6.75 लाख आणि 3 लाख अशी मोठी रक्कम घेतली आहे.
लग्नानंतर हमीदा आणि आफताबचं संसार छान सुरु होता. पण नंतर नंतर त्या दोघांमध्ये वाद व्हायला लागले. त्यानंतर हमीदाने पोलिसांकडे आफताबविरोधात 2023 मध्ये तक्रार केली. त्यात आफताबवर असे आरोप करण्यात आले की, पतीने पैशांसाठी तिची फसवणूक केली, तिच्यावर अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केला.
पोलिसांनी आफताबवर BNS अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याच्यावर कलम 377, 420, 498-अ, 504 आणि 506 अन्वये कारवाई केली आहे. अफताबवर अनैसर्गिक कृत्य, फसवणूक, विवाहित महिलेवर क्रूरता, जाणीवपूर्वक अपमान करून भांडणास प्रवृत्त करणे, तसंच गुन्हेगारी धमकी देणे असे कलमांतर्गंत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून तपास सुरु आहे. आता या प्रकरणाचा संबंध अब्दुला डोकाडियाच्या मृत्यूशी जोडलं जातंय. हमीदा आणि आफताबमधील प्रकरणात अब्दुला डोकाडिया एकमेव साक्षीदार होता. त्यामुळे या प्रकरणातून या कुटुंबातील सदस्याची हत्या झाली का या दिशेने पोलिसांचा तपासाची चक्र फिरायला लागली आहे.