Diwali Bonus:मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांना घसघशीत दिवाळी बोनस,आकडा ऐकून होईल आनंद!

BMC Worker Diwali Bonus:  पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बोनसबद्दल घोषणा केलीय.

प्रविण दाभोळकर | Updated: Oct 16, 2025, 04:50 PM IST
Diwali Bonus:मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांना घसघशीत दिवाळी बोनस,आकडा ऐकून होईल आनंद!
मुंबई पालिका बोनस

BMC Worker Diwali Bonus: बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दीपावली 2025 निमित्ताने आपल्या कर्मचाऱ्यांना आणि संबंधित शिक्षक-कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर केले आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबत घोषणा केलीय. विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 31 हजार रुपये, तर काही विशिष्ट गटांना भाऊबीज भेट म्हणून 5 हजार ते 14 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयनानंतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालंय.

Add Zee News as a Preferred Source

सर्वसमावेशक बोनस योजना

BMC ने आपल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त 31 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. यामध्ये पालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षण सेवकांचा समावेश आहे. हा निर्णय कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणारा असल्याचे म्हटलं जातंय.

शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लाभ

पालिकेच्या आणि खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षण सेवक आणि माध्यमिक शाळांमधील कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपये मिळणार आहेत. याशिवाय, अध्यापक विद्यालयातील अधिव्याख्याते आणि पूर्णवेळ शिक्षण सेवकांनाही याच रकमेचा लाभ मिळेल.

भाऊबीज भेटीचा विशेष समावेश

सामाजिक आरोग्य स्वयंसेविका (CHV) यांना भाऊबीज भेट म्हणून १४ हजार रुपये, तर बालवाडी शिक्षिका आणि मदतनीस यांना ५ हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही भेट कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवेल.

सणासुदीच्या काळात आर्थिक आधार

BMC च्या या निर्णयामुळे कर्मचारी आणि शिक्षकांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळेल. दीपावलीच्या खरेदी आणि उत्सवासाठी ही रक्कम उपयुक्त ठरेल, ज्यामुळे कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल, असं म्हंटल जातंय. 

FAQ

प्रश्न: बृहन्मुंबई महानगरपालिकेने दीपावली २०२५ साठी कोणत्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला आहे?

उत्तर: BMC ने आपल्या सर्व अधिकारी, कर्मचारी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अनुदानित/विनाअनुदानित शाळांमधील शिक्षण सेवक, अध्यापक विद्यालयातील अधिव्याख्याते आणि पूर्णवेळ शिक्षण सेवकांना ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. याशिवाय, सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना १४ हजार आणि बालवाडी शिक्षिका/मदतनीस यांना ५ हजार रुपये भाऊबीज भेट म्हणून मिळेल.

प्रश्न: दीपावली बोनसचा निर्णय कोणी घेतला आणि त्याचे महत्त्व काय आहे?

उत्तर: हा निर्णय महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घेतला आहे. ३१ हजार रुपयांचा बोनस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवेल आणि दीपावलीच्या सणात आर्थिक आधार देईल. सामाजिक आरोग्य स्वयंसेविका आणि बालवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट देऊन त्यांच्या योगदानाला मान्यता दिली आहे.

प्रश्न: सामाजिक आरोग्य स्वयंसेविका आणि बालवाडी कर्मचाऱ्यांना कोणता विशेष लाभ मिळणार आहे?

उत्तर: सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना (CHV) दीपावलीनिमित्त भाऊबीज भेट म्हणून १४ हजार रुपये मिळतील, तर बालवाडी शिक्षिका आणि मदतनीस यांना ५ हजार रुपये मिळतील. ही रक्कम त्यांच्या सणासुदीच्या खर्चासाठी उपयुक्त ठरेल आणि त्यांच्या मेहनतीचे कौतुक करेल.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More