BMC Election च्या धर्तीवर प्रभाग रचना जाहीर, एका क्लिकवर पाहा संपूर्ण सविस्तर तपशील

BMC Election 2025 Ward Structure : तिथं निवडणूक आयोगानं बिहार निवडणुकीच्या धर्तीवर पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलेलं असतानाच इथं BMC निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाची माहितीसुद्धा नुकतीच समोर आली आहे.   

सायली पाटील | Updated: Oct 6, 2025, 01:08 PM IST
BMC Election च्या धर्तीवर प्रभाग रचना जाहीर, एका क्लिकवर पाहा संपूर्ण सविस्तर तपशील
BMC Election 2025 Ward Structure declared latest update on a single click

BMC Election 2025 Ward Structure : तिथं निवडणूक आयोगानं बिहार निवडणुकीच्या धर्तीवर पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलेलं असतानाच इथं BMC निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाची माहितीसुद्धा नुकतीच समोर आली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

BMC Election 2025 Ward Structure : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 आधी पूर्ण कराव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले असतानाच मुंबई महानगरपालिकेसंदर्भातील एक अतिशय महत्त्वाचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. ज्यामध्ये मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली असून, त्याबाबतचा सविस्तर तपशील पालिकेनं जारी केला आहे. एका संकेतस्थळाच्या माध्यमातून याबाबतची माहिती नकाशासह देण्यात आली आहे. 

प्रभाग रचना जाहीर

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक-2025 च्या धर्तीवर प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाने मंजूरी दिली असून, अंतिम करण्यात आलेली प्रभाग रचना शासन राजपत्रामध्ये आणि महानगरपालिका संकेतस्थळावरील https://mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlBMCElectio2025 या लिंकवर दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली.

राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित असून मुंबई महापालिकेने आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा प्रारुप आराखडा 22 ऑगस्ट रोजी जाहीर केला होता, ज्यानंतर आता अंतिम प्रभाग आराखडा समोर आला आहे.

कुठे पाहता येईल प्रभाग रचनेचा आराखडा? 

https://mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlBMCElectio2025 या संकेतस्थळावर गेलं असता पालिकेकडून प्रभाग रचनेचा आराखडा समोर आणला आहे. जिथं, मुंबईतील 227 प्रभागांच्या रचनेला मंजुरी मिळाल्याचं लक्षात येत आहे. 

बऱ्याच काळापासून राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काळात अपेक्षित असून मुंबई महापालिकेने आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा प्रारुप आराखडा ऑगस्ट महिन्यात जारी केला होता. या  आराखड्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी नागरिकांना 4 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. ज्यानंतर 494  हरकती  आणि सुचनांना अनुसरून पार पडलेल्या तीन दिवसी. सुनावणीनंतर मुंबईतील 227 प्रभाग कायम ठेवत 2017 मधील प्रभागांमध्ये फारसे बदल करण्यात आल्याचं पाहायला मिळालं नाही. 

FAQ

BMC निवडणुकीसाठी प्रभाग रचना कधी आणि कशी जाहीर झाली?
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली असून, अंतिम रचना 6 ऑक्टोबर 2025 रोजी शासन राजपत्रात आणि BMC संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली.

BMC मध्ये एकूण किती प्रभाग आहेत आणि ते कसे ठरले?
मुंबईत एकूण 227 प्रभागांची रचना अंतिम झाली आहे. 4 सप्टेंबरपर्यंत 494 हरकती व सूचना मिळाल्या, त्यानंतर तीन दिवसांच्या सुनावणीनंतर ही रचना मंजूर झाली. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार BMC निवडणुका कधी होणार?
उत्तर: सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. 

 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More