BMC Election 2026 News : दक्षिण मुंबईतील अतिशय महत्त्वाच्या अशा कफ परेड भागातील मतदान केंद्रांवर गोंधळाची स्थिती मतदान प्रक्रियेच्या पहिल्याच तासापासून पाहायला मिळाली. इथं मतदारयादीत नाव आहे, पण बूथ कळेना, बूथ सापडेना, निवडणूक प्रक्रियेसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना बूथ नंबर शोधता येईना अशीच स्थिती दिसून आली.
परिणामी सकाळीच मतदान केंद्र गाठलेल्या मतदारांना केंद्र चकरा मारवया लागत आहेत. ज्यामुळं, मतदारांना मनस्ताप होत असल्याचे दिसत आहे. कफ परेड भागात वेगवेगळ्या ठिकाणी मतदानाची सोय आहे. या केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली. मात्र, मतदारयादीत नावावरून गोंधळ असतानाच बूथ नंबर सापडत नसल्याने किंबहुना ते शोधून देण्यात निवडणूक कर्मचारी कमी पडत आहेत. त्यामुळे मतदानासाठी वेळ येऊन मतदारांना ताटकळत राहावे लागत आहे. काही ठिकाणी पोलीस हे मतदारांना समजावून सांगत आहेत, मात्र कोणीच काही प्रतिसाद देत नसल्याने मतदान नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यावरून मतदारयादीत गडबड झाल्यानं गोंधळ असल्याचे दिसत आहे. त्यावर विचारणा करणाऱ्या मतदारांना निवडणूक कर्मचाऱ्यांकडून बडबड ऐकावी लागत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर गुरुवार, दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने विविध संकल्पना राबवून मतदान केंद्रे सजविली आहेत. फुलांची सजावट केलेली मतदान केंद्रे, पिंक मतदान केंद्र, सेल्फी पाँईंट, ठिकठिकाणी मंडप, प्रसार माध्यम कक्ष, सखी केंद्र उभारण्यात आली आहेत. यासोबतच ज्येष्ठ,दिव्यांग मतदारांनाही मतदान केंद्रावर विविध सुविधा पुरविण्यात येणार आहेत. मात्र ठिकठिकाणी ईव्हीएममध्ये होणारे बिघाड आणि मतदारयादीतील घोळ पाहता मतदारांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागत आहे ही वस्तूस्थिती.
फक्त मुंबईतच नव्हे, तर ठाणे मनपाच्या मतदानामध्येही प्रभाग क्रमांक 3 मध्ये सेंट झेवियर्स या शाळेत रूम नंबर 10 आणि 12 या ठिकाणी मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता त्यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांना काही वेळ तात्काळत उभे राहावं लागले. रूम नंबर 10 येथील मशीन मध्ये बिघाड होता तर रूम नंबर 12 मध्ये मशीनला करंट (शॉक) लागत होता त्यामुळे हे बिघड दुरुस्त करण्यासाठी सुमारे अर्धा तासाचा कालावधी गेला. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More
LIVE|
ENG
152(19.4 ov)
|
VS |
SCO
5/1(1.2 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
IRE
(20 ov) 235/5
|
VS |
OMA
139(18 ov)
|
| Ireland beat Oman by 96 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(20 ov) 196/6
|
VS |
NED
103(15.5 ov)
|
| USA beat Netherlands by 93 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
QAT
(20 ov) 201/4
|
VS |
BRN
170/5(20 ov)
|
| Qatar beat Bahrain by 31 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.