BMC Election : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं सध्या सर्वच पक्ष प्रचारांमध्ये गुंतले आहेत. घरोघरी जाऊन प्रचार करण्यापासून ते मैदानं, मंडई अशा ठिकाणीसुद्धा प्रचारसभांचं आयोजन केलं जात आहे. काळानुरूप शहरात झालेला बदल आणि वस्तूस्थिती पाहता काही पक्ष सर्वसमावेषक प्रचार करत आहेत, तर काही पक्षांनी मात्र मुंबई, ही मराठी माणसाचीच... असा पवित्रा घेत प्रचाराची सूत्र हाताळल्याचं पाहायला मिळत आहे. अशा या मुंबई शहरात महापालिका निवडणुकीआधी नेमकी काय स्थिती आहे? हे लक्षात घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं. कारण, ज्या मराठीसाठी नेतेमंजळी झगडत आहेत तिच मराठी माणसं मुंबईबाहेर गेल्याचं वास्तव इथं पाहायला मिळत आहे.
मुंबई शहरात गतकाळातील निवडणुकीवर लक्ष टाकल्यास उपलब्ध आकडेवारीनुसार 2017 च्या च्या बीएमसी निवडणुकांमध्ये अमराठी नगरसेवकांचं प्रमाण 33 टक्क्यांवर आलं होकतं. 1970 च्या दशकात ते सुमारे 45 टक्के इतकं होकतं. आता तुम्ही म्हणाल यात तर घट झाली, मग मुद्दा काय? तर, याच काळात मराठी भाषिकांचं प्रमाण 1971 मध्ये 41.99 टक्के इतकं होतं, जे 2011 मध्ये 35.40 टक्क्यांवर घसरल्याचं लक्षात आलं.
मुंबईचं एकंदर क्षेत्रफळ आणि या शहराच्या विस्तारलेल्या कक्षा पाहता इथं सुरुवातीपासूनच विविध संस्कृतींचा एकोपा पाहायला मिळाला. वर्षानुवर्षांपासून या शहरात विविधभाषी, विविध संस्कृतीच्या आणि तितक्याच विविध ठिकाणांहून आलेल्या नागरिकांचा वावर पाहायला मिळाला, ज्यांनी कळत नकळत हे शहर घडवलं आणि आज जे महानगर दिसतं ती मायानगरी आकारास आली. मुंबईत परराज्यांतून अनेकजण आले आणि या शहराचे झाले. अशाच या मुंबईत गेल्या 4 वर्षांचा आढावा घेतल्यास इथं प्रामुख्यानं हिंदी भाषिकांची संख्या पाच पटींनी वाढली, पाहता पाहता ज्यांना स्थलांतरित म्हटलं जात होतं, त्यांचा शहरातील आकडा वाढत गेला, ज्यामध्ये दक्षिण भारतीय, सिंधी, गुजराती, मारवाडी, पारशी यांचा वरचष्मा दिसला.
अमराठी समाजांनी व्यापलेल्या मुंबई महापालिकेत अमराठी नगरसेवकांचा आकडा एक तृतीयांश असून, यावरूनच ही संख्या नेमकी किती आणि कशी वाढली हे लक्षात येत आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी उभ्या असणाऱ्या अमराठी उमेदवारांचा आकडाही मोठा असून, प्रत्येक पक्षानं त्या त्या प्रभागाची गरज पाहून अमराठी उमेदवारांना तिकीट दिलं आहे. दरम्यान, 2017 च्या निवडणुकीचा आढावा घेतल्यास तेव्हाच्या निवडणुकांत अमराठी नगरसेवकांचं प्रमाण 33 टक्क्यांवर आलं, तर 1970 च्या दशकात ते 45 टक्के इतकं होतं. याच काळात मराठी भाषिकांचं प्रमाण 1971 मध्ये 41.99 टक्क्यांवर होतं, जे 2011 मध्ये 35.40 टक्क्यांवर घसरलं ही परिस्थिती नेमकं काय सांगते हे पाहणंही महत्त्वाचं.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.