)
BMC Election: राज्यात पालिका निवडणुकींची रणधुमाळी सुरू झालीय. भाजप-शिवसेनेकडून पालिका निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात आलीय. मुंबईत भाजपचं टार्गेट 150 जागांवर तर शिंदेंची शिवसेना देखील 100 प्लस जागा लढवण्यावर आग्रही असल्याची माहिती आहे. त्यामुळे जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
मुंबईत आगामी पालिकेत शिवसेना आणि भाजपात जागावाटपावरून रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण एकीकडे भाजपनं बीएमसीसाठी 150चं टार्गेट डोळ्यासमोर ठेवलंय तर दुसरीकडे शिंदेंची शिवसेना 101 जागांवर लढण्यासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून वादाची चिन्ह आहेत.
2017 मध्ये शिवसेनेला 84 जागा मिळाल्या होत्या तर भाजपला 82 जागा मात्र एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर जवळपास 60 नगरसेवक एकनाथ शिंदेंकडे आहेत. तर भाजपकडे सध्या 85 नगरसेवक आहेत. त्यामुळे त्या 60 जागांवर शिवसेना आग्रही आहे. सध्या भाजप आणि शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचा आकडा 145 आहे.त्यामुळे उर्वरित 82 जागांचं समसमान वाटप करण्याची मागणी देखील शिवसेनेनं केल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदेंची शिवसेनेची 60 प्लस 41 म्हणजेच 101 जागांची मागणी आहे. शिंदेंची 101 जागांची मागणी भाजपनं मान्य केल्यास भाजप 85 प्लस 41 126 जागांवर लढू शकते.
पालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. मुंबईत वर्चस्व टिकवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेला जास्तीत जास्त जागा लढवाव्या लागतील. मात्र, शिवसेना किती जागांवर लढणार याबाबत एकनाथ शिंदेच निर्णय घेणार असल्याचं विधान उदय सामंतांनी केलंय.
महायुतीमध्ये अनेक ठिकाणी स्वबळाचा नारा देण्यात आलाय. त्यामुळे मुंबईत महायुती एकत्र लढणार की स्वबळावर याकडे देखील लक्ष लागलंय. मात्र, एकनाथ शिंदेंनी निवडणुका महायुतीसोबतच लढवण्याची भूमिका घेतलीय. तशा सूचना त्यांनी आपल्या नेत्यांना देखील दिल्या आहेत.
निवडणुका महायुतीतच लढायच्यात ही भूमिका ठेवा, शिंदेंच्या सेनेच्या मंत्र्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मनपा, झेडपी निवडणुका महायुतीत लढायच्या आहेत, जिथे जुळत नसेल तिथं मैत्रीपूर्ण लढू असं म्हटल जातय. जिथं शक्य असेल तिथे सर्वत्र महायुती म्हणूनच लढू, अशा शिंदेंकडून शिवसेनेच्या बैठकीत मंत्र्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई पालिकेवर भाजपला देखील आपली सत्ता प्रस्थापित करायची आहे. त्यामुळे भाजपनं देखील जास्त जागा लढण्याची तयारी केलीय. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची 100 प्लस जागांची मागणी भाजप मान्य करणार का? शिवसेना आणि भाजप बीएमसीत एकत्र लढणार का? हे पाहणं
महत्वाचं ठरणार आहे.
उत्तर: होय, भाजपने १५० जागांचे लक्ष्य ठेवले असून, शिंदे गट शिवसेनेने १०१ जागांची मागणी केली आहे. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेला ८४ आणि भाजपला ८२ जागा होत्या, पण फुटीमुळे शिंदे गटाकडे ६० नगरसेवक आहेत. यामुळे ५० जागांवरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
उत्तर: एकनाथ शिंदे यांनी महायुतीसोबतच निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली असून, मंत्र्यांना सूचना दिल्या आहेत. जिथे शक्य असेल तिथे महायुतीत लढा, अन्यथा मैत्रीपूर्ण लढत, असा फॉर्म्युला आहे. मुंबईत एकत्र लढण्याची तयारी आहे.
उत्तर: शिंदे गट १०१ जागांची मागणी करत असून, त्यात ६० विद्यमान नगरसेवकांच्या जागा आणि ४१ नव्या जागांचा समावेश आहे. भाजपकडे सध्या ८५ नगरसेवक आहेत आणि ते ८५ + ४१ = १२६ जागा लढू शकतात, जर मागणी मान्य झाली तर.