Political News : (BMC Election) आगामी पालिका निवडणुकीच्या धर्तीवर सध्या अनेक राजकीय समीकरणं बदलत असतानाच तत्पूर्वी याच निवडणूक प्रक्रियेवर शंका असल्याने त्याबाबत चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ मंगळवार, 14 ऑक्टोबर 2025 रोजी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीस पोहोचलं. शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड यांचा या शिष्टमंडळात सहभाग पाहायला मिळाला. मविआ नेत्यांसोबत राज ठाकरेही सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. लोकशाही बळकट व्हावी, निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ व्हावा हा भेटीचा मुख्य उद्देश असल्याचं मविआ नेत्यांनी सांगितलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मविआच्या वतीनं आयुक्तांना एक निवेदन सादर केलं.
सदर बैठकपर भेटीमध्ये राज ठाकरे यांनी आयुक्तांपुढे अनेक प्रश्न उपस्थित केले. जिथं, दोन दोन ठिकाणी मतदारांचे नाव कसं? वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसं? असे सवाल केले. तर, विधानसभा निवडणुकीआधी 18 नोव्हेंबरला आम्ही आयोगाला पत्र देत खोटे मतदार नोंदणी झाल्याची बाब अधोरेखित करत त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याचा सूर आळवला. यावेळी शिष्टमंडळाकडून VVPAT उपलब्ध नाहीत, मग बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या अशी मागणीसुद्धा केली.
'येत्या काही महिन्यांत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. परंतु २०२४ मध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांपासून आणि एकंदरीतच निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल राजकीय पक्षांबाबत सामान्य माणसाच्या मनात खूपच शंका आहेत. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे असे आम्ही सगळेच सध्याच्या एकूणच निवडणूक आयोगाच्या कारभाराकडे बघितल्यावर, खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे शंका उत्पन्न होत आहे. असो. निवडणूक आयोग आजही स्वायत्त आहे असं आम्ही मानतो आणि त्यामुळं राजकीय व्यवस्थेच्या मनात आणि सामान्यांच्या मनात काही प्रश्न आहेत आणि त्यावर काही ठोस कृतीदेखील अपेक्षित आहे', असा आग्रही सूर निवेदन पत्रात मांडण्यात आला.
महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2024 ला झाल्या आणि त्यादरम्यानची मतदार यादी 2024 ला प्रसिद्ध झाली. मात्र त्यानंतर ऑक्टोबर 2024 ते जुलै 2025 दरम्यान यादीत जी नावं समातिष्ट होती ती नावं आणि नवीन यादी अजूनही प्रसिद्ध का झाली नाही? असा सवाल मविआ शिष्टमंडळानं उपस्थित केला. मतदार यादीवर अभ्यास करणे हा प्रत्येक राजकीय पक्ष आहे, पण राजकीय पक्षांनाच किंवा आम्ही तर म्हणतो अगदी सामान्य माणसालासुद्धा मतदार यादी का बघायला का उपलब्ध नाही आहे. ही यादी लपवण्यात काही राजकीय हेतू आहेत की, कोणाचा तरी दबाव आहे? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.
निवडणूक आयोगाने आता तरी कोणाच्या तरी दबावाच्या बाहेर येऊन भेदभाव न करता आम्ही उपस्थित केलेल्या मागण्या आणि त्यावरचे उपाय यावर कार्यवाही करावी. या मागण्या किंवा उपाय या फक्त राजकीय पक्षांच्यांच आहेत असं नाही, तर एकूणच सामान्य माणसांच्या मनातील प्रश्नांचं प्रतिबिंब आहे आणि याचं संपूर्ण भान महाराष्ट्र निवडणूक आयोग ठेवेल, अशी आशा मविआच्या या सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या निवेदनातून व्यक्त करण्यात आली.
सर्वपक्षीय शिष्टमंडळाची बैठक कधी आणि कुठे झाली?
मंगळवार, 14 ऑक्टोबर 2025 रोजी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत ही बैठक झाली. याचा मुख्य उद्देश लोकशाही बळकट करणे आणि निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास दृढ करणे असल्याचे मविआ नेत्यांनी सांगितले.
शिष्टमंडळात कोणकोण सहभागी होते?
शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेना (यूबीटी)चे उद्धव ठाकरे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड यांचा समावेश होता. विशेष म्हणजे मविआ नेत्यांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरेही सहभागी झाले.
शिष्टमंडळाने कोणती मागणी केली?
शिष्टमंडळाने VVPAT उपलब्ध नसल्यास बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली. याशिवाय, निवेदनात निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर शंका व्यक्त केली गेली.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More
LIVE|
IND
153/7(19 ov)
|
VS |
AUS
|
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.