)
BMC Housing Lottery 2025 : म्हाडाप्रमाणे मुंबई महापालिका देखील मुंबईत स्वस्त घरांची लॉटरी काढणार आहे. मुंबई महापालिका 426 घर अत्यल्प दरात विकणार आहे. BMC च्या घरांची लॉटरीसाठी अर्जविक्री दिवाळीत सुरु होणार आहे. मुंबई महापालिकेने याचे संपूर्ण वेळापत्रक जारी केले आहे, उत्पन्नवाढीच्या स्त्रोत म्हणून BMC ने मुंबईत घरे विकण्याचा निर्णय घेतला आहे,
विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली- 2034 च्या विनियम 15 व 33 (20) (ब) अन्वये प्राप्त ४२६ सदनिकांच्या विक्रीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://bmchomes.mcgm.gov.in या संकेतस्थळावरुन अर्ज मागविण्यात येणार आहेत. 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी १० वाजेपासून ऑनलाइन अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू होईल. 14 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. तर, अर्ज शुल्क आणि अनामत रक्कम 14 नोव्हेंबर 2025 रात्री 11.59 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येईल. पात्र अर्जदारांची अंतिम यादी 18 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
20 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता पार पडेल. या सोडतीतून निवड झालेल्या यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे 21 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.या सोडतीसंदर्भातील माहिती पुस्तिका दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून संकेतस्थळावर उपलब्ध होईल. प्रक्रियेसंदर्भातील विविध प्रकारची माहिती तसेच अटी व शर्तींबाबत पुस्तिकेमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. या प्रक्रियेतील सदनिकांसंदर्भात आवश्यक बदल करण्याचा अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे आहेत. तसेच, माहिती पुस्तिकेतील सर्व अटी व शर्ती (वेळोवेळी होणाऱ्या सुधारणांसह) लागू राहतील, असे प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे. कांजुरमार्ग, भायखळा, बोरिवली आणि अंधेरी या परिसरात ही BMC ची लॉटरी असले.
दरम्यान, या सोडतीसंदर्भात माहिती व मदतीसाठी ०२२-२२७५४५५३ या मदतसेवा क्रमांकावर किंवा bmchomes@mcgm.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधावा. अथवा, ‘सहाय्यक आयुक्त (मालमत्ता), चौथा मजला, विस्तारित इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, मुंबई – ४०० ००१’ या पत्त्यावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आणि कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.