Mumbai Homes: मुंबईत घर घेणे म्हणजे हल्ली परवडत नाही. घराच्या किंमती अव्वाच्या सव्वा झाल्या आहेत. मुंबई उपनगरात घर घेण्याचा विचार केला तरी वनबीएचके घराची किंमत ८० ते ९० लाखांच्या घरात जाते. अशावेळी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 12 लाखांत मुंबईत घरे मिळणार आहेत. या घरांसाठीच्या अटींमध्ये बदलदेखील करण्यात आले आहेत.
मुंबई महापालिकेच्या कामगार आणि कर्मचाऱ्यांसाठी माहुल येथे बांधलेल्या घरांची विक्री करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र या निर्णयाला प्रतिसाद कमी मिळाल्याने आता प्रशासनाने अटींमध्ये बदल केला आहे. बदललेल्या अटीनुसार श्रेणी 1मधील कर्मचारी वगळता सर्वच श्रेणीतील कर्मचारी आणि अधिकारी घरांसाठी अर्ज करु शकणार आहेत. अर्ज करण्याची मुदतदेखील आता 15 मेपर्यंत करण्यात आली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बांधलेल्या सदनिका पालिकेला विविध प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. माहुलच्या आंबापाडा येथील एव्हर स्माईल, एस.जी. केमिकल, व्हिडीओकॉन अतिथी या ठिकाणच्या एकूण 13 हजार सदनिका प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन केल्यानंतरही रिक्त आहेत. त्या ठिकाणी अन्य प्रकल्पबाधित जाण्यास तयार नसल्याने त्या रिक्त आहेत. त्यामुळे जाहिरात प्रसिद्ध करून या सदनिका पालिकेच्या तृतीय
220 कामगारांचे अर्ज आतापर्यंत झाले प्राप्त होते.
मुंबई महापालिका प्रशासन म्हाडाच्या धर्तीवर तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच लॉटरी पद्धतीने स्वतःची घरे देणार आहे. महापालिका प्रशासनाने माहुल येथे बांधलेल्या इमारतीच्या संकुलात शाळेसह रुग्णालय व इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. मुंबईच्या माहुल परिसरात 225 चौ. फुटांची 4 हजार 700 घरे बांधली असून त्यांची किंमत 12 लाख 60 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. लॉटरीच्या माध्यमातून ही घरे विकली जाणार आहेत.
नव्या अटीनुसार, सदनिकेचा लाभ घेणारे कर्मचारी जर सेवा निवासस्थानात राहत असतील, तर त्यांना माहूलमधील सदनिकेचा ताबा घेतल्यानंतर पालिकेचे सेवा निवासस्थान सोडावे लागणार आहे. आणि चतुर्थ श्रेणी कामगारांसाठी उपलब्ध असतील, असे जाहीर करण्यात आले. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत 15 मार्च होती. ही मुदत आता 15 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.