रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला प्रवाशांचा जीव, अंबरनाथ ट्रेनने धडक दिल्याने 2 प्रवासी ठार

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका लोकल सेवेवर झाला आहे. या आंदोलनामुळं मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि तीन प्रवासी लोकलमधून खाली पडले

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 6, 2025, 09:12 PM IST
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला प्रवाशांचा जीव, अंबरनाथ ट्रेनने धडक दिल्याने 2 प्रवासी ठार
Central Railway Employees ProtestAmbernath local train hits four passengers, three dead near sandhurst road

Mumbai Local Accident: सीएसएमटी रेल्वे स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळं झालेल्या गर्दीमुळं मोठी दुर्घटना घडली आहे. लोकलमधून 5 प्रवासी पडल्याचे समोर येतेय. यात दोघांचा मृत्यू झाला असून 3 प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.

Add Zee News as a Preferred Source

संध्याकाळी 5.45 च्या सुमारास रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं. ऑफिस सुटण्याच्या वेळेतच कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळं लोकल खोळंबल्या होत्या. जवळपास 40-50 मिनिटे सीएसएमटी स्थानकात मध्य आणि हार्बर मार्गावर लोकल स्थानकातच खोळंबल्या होत्या. लोकल ठप्प असल्याने गर्दी वाढली होती. याच गर्दीमुळं ही दुर्घटना घडली आहे. गर्दीमुळं ट्रेन ठप्प असताना काही प्रवासी रुळांवर चालत निघाले होते. त्याचवेळी लोकलने धडक दिल्याचे समोर येत आहे.

मध्य रेल्वेच्या मस्जिद स्थानकाजवळ 5 प्रवाशांना अंबरनाथला जाणाऱ्या लोकलने धडक दिली. मेन लाइनवरुन रुळावरुन जात असताना अंबरनाथ लोकलची धडक या प्रवाशांना बसली. लोकलच्या धडकेत हे प्रवासी गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जे. जे रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आलं. मात्र दुर्दैवाने त्यातील दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 3 प्रवासी गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघात कसा झाला?

सीएसएमटी स्थानकात जवळपास तासाभरापासून लोकल ठप्प होती. त्यामुळं अनेक प्रवासी उशिर होतोय म्हणून स्टँडहस्ट स्थानकात उभे असलेले नागरिक पायी चालत निघाले होते. रूळांवरुन चालत असताना अंबरनाथला निघालेल्या लोकलने चार जणांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

आंदोलन का करण्यात आलं होतं?

साधारण पाच महिन्यांपूर्वी मुंब्रा येथे लोकलमधून पडून पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर 9 जण गंभीर जखमी झाले होते. मुंब्रा अपघात प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेच्या दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हा गुन्हा चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आला होता याकारणाने रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळं 5.50 ते 6.25 पर्यंत लोकल स्थानकातच उभ्या होत्या. त्यामुळं मोठी गर्दी स्थानकात जमली होती. पिक अव्हर्समध्ये लोकल ठप्प झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली होती. 

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More