)
Devendra Fadnavis on Cyber Fraud: सायबर गुन्हा रिव्हर्स करु शकत नाही. पण आपण त्याला रोखू शकतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. अशात जनजागृती महत्त्वाची असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं आहे. मुंबईत आयोजित सायबर जागरुकता कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्याला आलेला एक धक्कादायक अनुभवदेखील सांगितला. युट्यूबवर माझं एक भाषण पाहिलं, तर मी न पाहिलेल्या एका डॉक्टराचं औषध घेण्यासाठी आवाहन करत होतो असं ते म्हणाले.
"मी युट्यूब ब्राऊज करत होतो. माझं भाषण मी उघडलं. मीच भाषण करत होतो. आवाजही माझाच होता, पण भाषण वेगळंच होतं. मी सांगत होतो की, डॉक्टर शेट्टीचं औषध वापरलं, चांगलं होतं, तुम्ही देखील वापरा. डॉक्टर शेट्टी काळा का गोरा मी पाहिलेलं नाही. हे डीपफेकही नव्हतं. त्यांनी फक्त ऑडिओ सिंक करुन दुसरं भाषण टाकलं. एखाद्याला बेलामूपणे औषध रेकमेंड करतोय असं वाटेल. माझ्याच आवाजातलं दुसरं भाषण दाखवलं जात होतं. लोकांना वाटतं होतं मीच ते खरं रेकमेंट करतोय, मात्र तसं नव्हतं," असा धक्कादायक अनुभव देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला.
गोष्ट लहान आहे. पण एआय आल्यानंतर गुन्ह्यांच्या किती संभावना तयार झाल्या आहेत, त्या अनंत प्रकारच्या आहेत. जागरुकता हाच एक उपाय आहे असंही त्यांनी सांगितलं.
LIVE | Inauguration of 'Cyber Awareness Month October 2025'
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 3, 2025
12.10pm | 3-10-2025Mumbai.@DGPMaharashtra#Maharashtra #Mumbai #CyberAwarenessMonth https://t.co/GbCw91V1ey
पुढे ते म्हणाले की, "डिजिटल अरेस्ट संदर्भात आपण अव्हेअरनेस तयार करत आहोत. तरीही रोज एक केस आपल्याकडे येत आहे. चांगल्यातले चांगले लोकं, लष्करातील निवृत्त अधिकारी देखील यात अडकलेले पाहिलं आहे. अशात हे फार मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. आता परिस्थिती अशी आहे की माझ्या फोन नंबरवरुन अक्षयला फोन जाऊ शकतो आणि निमंत्रण दिलं जाऊ शकतं की अमुक कार्यक्रमाला या. आणि त्यांना कळणारदेखील नाही की मी तो नव्हतो डिजिटल आयडेंडिटीसंदर्भात कुकिज ॲक्सेप्ट केल्या की सर्वांना ॲक्सेस मिळतो".
"खूप घाबरुनही इथे चालणार नाही. नवीन युगात गेलो तर त्या डिजिटल मूल्यांच्या गोष्टी देखील तयार कराव्या लागतील. अजूनही समाजात अशा गोष्टी घडल्यावर ते पुढे येत नाही. आमची बदनामी होईल, समाज काय म्हणेल असं बोलून सांगत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टीत जागरुकता तयार करणं गरजेचं आहे. सायबर सेक्युरीटीची व्यवस्था तयार केली आहे. लवकर माहिती मिळणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राने ती क्षमता तयार केली आहे. आपण 1945 ला तक्रार देत माहिती दिली तर कळेल. काही गडबड आहे असं लक्षात येताच तुम्ही 1945 क्रमांक लावला तर गोष्टी वेगवान फिरतील," असंही त्यांनी सांगितलं.
"मी आज आयफोन वापरतो, मात्र त्याला देखील माहिती आहे, मी काय बोलतोय. माझं व्यक्तिमत्व तो पडताळत आहे. नव्या पिढीसमोर आव्हानं आहेत, मात्र त्यांच्यात जागरुकता असली पाहिजे. लॉटरी लागण्याची भावना असेल तर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत, मीच का? हा प्रश्न आपण उपस्थित केला पाहिजे. प्रतिप्रश्न आपण उभे केले पाहिजेत. डिजिटल जगाने उभे केलेल्या प्रश्नांना डिजिटल जगच उत्तर देत आहे. गुन्हा केला तर त्याचे डिजिटल फुटप्रिंट तुम्हाला मिळणारच," असंही त्यांनी सांगितलं.
डिपफेक आले तर शोधणं आता खूप सोपी आहे. आधी वाटत होतं मोठं चॅलेंज आहे, मात्र अडचणी आपण दूर केल्या असंही ते म्हणाले आहेत.
FAQ
1) सायबर क्राइम म्हणजे काय?
सायबर क्राइम ही संज्ञा संगणक आणि इंटरनेटशी संबंधित असणाऱ्या गुन्ह्यांना उद्देशून वापरली जाते, ज्यात संगणकाचा प्रामुख्याने वापर होतो. यामध्ये हॅकिंग, खासगी माहिती चोरणे, प्रताधिकारभंग इत्यादींचा समावेश होतो.
2) सायबर क्राइमचे मुख्य प्रकार कोणते आहेत?
सायबर क्राइमचे काही मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत:हॅकिंग: अनधिकृत प्रवेश मिळवणे.
सायबर स्टॉकिंग: ऑनलाइन पाठलाग करणे किंवा धमकी देणे.
सायबर पॉर्नोग्राफी: अश्लील सामग्री पसरवणे.
फिशिंग: बनावट ईमेलद्वारे माहिती चोरणे.
मॉर्फिंग: छायाचित्रांमध्ये फेरफार करून बदनामी करणे.
ई-मेल छळ: अनावश्यक किंवा धमकीचे मेसेज पाठवणे.
3) भारतात सायबर क्राइमसाठी कोणते कायदे आहेत?
भारतात सायबर गुन्ह्यांसाठी माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० (IT Act) लागू आहे, जो २००८ मध्ये सुधारित झाला. हा कायदा हॅकिंग, अश्लील मजकूर प्रसारण, डेटा चोरी इत्यादी गुन्ह्यांना शिक्षा देतो. तसेच, भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलमांशी जोडलेला आहे.