राज्यातील सत्तातरानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहेत. राज ठाकरे यांच्या नव्या घरी पहिल्यांदाच गणपतीचे आगमन झालं आहे. त्यामुळे अनेक राजकारण्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी येत आहेत. मात्र सत्तानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासमोर मोठा न्यायालयीन लढा उभा राहिला आहे. मूळ शिवसेना कोणाची असा लढा सध्या शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गट यांच्यात सुरु आहे. या संघर्षादरम्यानच भाजप आणि शिंदे गटाने एकत्र येत सत्तास्थापन केली आहे.


दरम्यान शिंदे गटाच्या फुटीनंतर मनसे चर्चेत आली होती. बंडखोरीनंतर शिंदे गटावर विलीनकरणाची वेळ आली तर त्यांना मनसेत विलीन होता येऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र त्यावेळी मनसे नेत्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली नव्हती. मात्र त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. 


गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अनेक भाजप नेत्यांनी घरी जाऊन भेट घेतली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा सुरु होती. त्यावर भाजप नेत्यांनी याबाबत स्पष्ट प्रतिक्रिया दिली नव्हती.