मुंबई : रोज वापरात येणाऱ्या किंवा नेहमी पाहण्यात येणाऱ्या काही वस्तूंवरील माहितीकडे आपण दुर्लक्ष करत असतो, पण ती माहिती महत्वाची असते. गॅस सिलिंडरच्या तोंडाशी साईडच्या स्ट्रीपवर काही अंक आणि इंग्रजी अक्षर लिहिलेलं असतं, त्याचा नेमका अर्थ काय असतो, हे जाणून घेणं महत्वाचं आहे.


सिलिंडरची एक्स्पायरी ओळखा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लिक्वीफाईड पेट्रोलियम गॅस अर्थात एलपीजी सिलिंडरच्या तोंडाशी असलेल्या स्ट्रीपवर हा कोड लिहिलेला असतो, अर्थात तुमच्या सिलिंडरची एक्स्पायरी सांगणारा हा कोड असतो. 


या कोडचा आता फारसा वापर होत नाही, हे देखील खरं आहे, कारण एक्स्पायरी आधीच सिलिंडर वापरण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. सिलिंडरचा तुटवडा असल्याने एक्स्पायरीच्या आधीच तो संपवून रिकामा होतो. पण सिलिडरच्या कोडची माहिती ठेवणे आवश्यक आहे.


या स्ट्रीपवर A ते D एक्स्पायरी 


A जानेवारी ते मार्च
B एप्रिल ते जून
C जुलै ते सप्टेंबर
D ऑक्टोबर ते डिसेंबर


या आकड्याच्या समोर जर 17 असेल तर 2017 हे वर्ष असा त्याचा अर्थ होतो. आता सिलेंडरची नेमकी एक्स्पायरी तुमच्या लक्षात आली असेल.