मुंबई : कोरोनावर मात करून ठणठणीत बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या देखील वाढत जात आहे. या रूग्णांमुळे एक सकारात्मक विचार समाजामध्ये पसरत आहे. संपूर्ण जगाला वेढीस धरलेल्या कोरोनावर आपण यशस्वी मात करू शकतो हा विश्वास या रूग्णांमार्फत समाजात पसरत आहे. असं असताना एका ८२ वर्षीय आजींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. या आजींचा व्हिडिओ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोशल मीडियावर शेअर केला असून आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये त्यांच कौतुक देखील केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना विषाणू विरुद्ध यशस्वी झुंज देणाऱ्या ८२ वर्षांच्या आजींचे घरी जंगी स्वागत! Grand welcome for the 82 year old Aaji who beat Coronavirus & returned home. 

Posted by CMOMaharashtra on Thursday, April 30, 2020

कोरोनावर मात करून ठणठणीत बऱ्या झाल्यावर आजी  आपल्या घरी पोहोचल्या. यावेळी त्यांना पोलिसांच्या गाडीतून आपल्या घरी पोहोचवण्यात आलं. पोलिसांकडून आणि आजींच्या नातेवाईकांनी, परिसरातील लोकांनी आजींच मनापासून स्वागत केलं. हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. 


कोरोना झालेल्या प्रत्येक व्यक्तींला व्हेंटिलेटरची आवश्यकता लागते असं नाही. तसंच व्हेंटिलेटर लावला म्हणजे आता सगळं संपल असही नाही. मन खंबीर असेल आणि सकारात्मक विचार असतील तर या कोरोनावर तुम्ही यशस्वी मात करू शकतो. हा काळ कसोटीचा  नक्की आहे पण कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे. महाराष्ट्राला संघर्षाचा इतिहास आहे. आणि आता देखील महाराष्ट्रातील जनता या कोरोनाशी दोन हात करून यशस्वी होणारच आहे, असा विश्वास प्रत्येकाकडून वर्तवला जात आहे.