डरपोक सोमय्या बाप-बेटे आता गायब झालेत - संजय राऊत
Sanjay Raut criticized on Kirit Somaiya : उत्तरं द्यायची वेळ आल्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या अटकपूर्व जामिनासाठी गेलेत, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
मुंबई : Sanjay Raut criticized on Kirit Somaiya : उत्तरं द्यायची वेळ आल्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या अटकपूर्व जामिनासाठी गेलेत, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. डरपोक सोमय्या बापबेटे आता गायब झालेत, असे राऊत म्हणाले. दरम्यान, मुलुंडचा महात्मा अशी टीका संजय राऊत यांनी याआधी केली होती.
किरीट सोमय्या ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात जाणार नाहीत. किरीट आणि निल सोमय्या आपल्या वकिलांच्या मार्फत पोलिसांच्या समन्सला उत्तर देणार आहेत. विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी पैसे जमा केले होते. हे पैसे राजभवनात जमा केलेले नाहीत, असा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात किरीट आणि निल सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर काल आयएनएस विक्रांतसाठी निधी जमा करून तो हडपल्याचा आरोप केला. कोट्यवधीचा हा निधी त्यांनी परस्पर हडप करुन आयएनएस विक्रांतसंदर्भात देशभावनेचा बाजारात लिलाव केला. महाराष्ट्र सर्व खपवून घेईल पण देशविरोधात काही खपवून घेणार नाही. राज्यात यावर आंदोलन छेडण्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. त्यानंतर सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर चौकशीसाठी पोलिसांनी समन्स पाठवले होते. आज त्यांना उपस्थित राहण्याचे सांगितले होते. परंतु ते नॉटरिचेबल झालेत.
दरम्यान, सिल्व्हर ओक राज्यातलं वातावरण बिघडवण्याचं काम केले जात आहे. पण हा प्रयत्न हाणून पाडला जाईल. तुम्हीही काचेच्या घरात राहता, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. विरोधी पक्ष हल्ल्याचं समर्थन करतंय हा दळभद्रीपणा आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. सदावर्तेंना भाजपचं पाठबळ आहे. कालचा हल्ला हा त्यातलाच एक भाग होता असं राऊत यांनी म्हटलंय. सरकारने संयमाचा कडेलोट केल्याचा परिणाम म्हणजे कालचा हल्ला, असं राऊत म्हणाले. संजय राऊत सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत.