Dahisar Toll Plaza: मुंबईच्या उत्तरेकडील होणाऱ्या वाहतूक कोंडींवर मार्ग काढण्यासाठी गेल्या काहीदिवसापासून दहिसर टोलनाकाचे स्थलांतर करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. दहिसरचा टोलनाका वसई हद्दीत स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या निर्णयाला ग्रामस्थांनी नकार दिला होता. त्यानंतर आता दहिसर टोलनाक्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबईच्या उत्तरेकडील त्रास प्रवेशद्वारावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा आणि वायू प्रदूषणाचा संपविण्यासाठी दहीसर टोलनाक्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून टोल भरणा प्रक्रिया वेगवान करण्याचा नवा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. यासंदर्भात मंगळवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
दहिसर टोलनाक्यावर दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असून, त्यामुळे रुग्णवाहिका, स्कूल बसेस आणि अत्यावश्यक सेवांना अडथळा निर्माण होतो. तसेच यामुळे प्रदूषणात भर पडते आणि प्रवाशांचा वेळ वाया जातो. हा टोलनाका स्थलांतरीत करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार दहीसर टोलनाका मूळ जागेवरून हलवून तो वसई हद्दीत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र स्थानिकांनी या निर्णयाला विरोध केला होता.
नागरिकांचा विरोध लक्षात घेऊन आता एआयवर आधारित नवीन टोल भरणा प्रक्रिया चालू करण्यासंबंधीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्याचबरोबर, पेणकर फाटा, सिग्नल येथील वाहतूक सुलभता व दिल्ली दरबार हॉटेल ते दहिसर टोल नाका येथील रस्ता रुंदीकरण वेगाने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एआय कॅमेऱ्यामुळं वाहनांच्या नंबर प्लेट स्कॅन होऊन आपोआप टोल भरला जाईल. त्यामुळं टोलनाक्यावरील वाहनांच्या लांबच लांब रांगा कमी होती. तसंच, टोल नाक्यांचा भरणा एकाच ठिकाणी करण्याची अंमलात आणल्यास वाहतूक आणखी सुरळीत होईल.
उत्तर: दहिसर टोलनाका स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे, आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून टोल भरणा प्रक्रिया वेगवान करण्याचा नवा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
उत्तर: मुंबईच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण कमी करणे हा या नवीन प्रस्तावाचा मुख्य उद्देश आहे.
उत्तर: टोल भरणा प्रक्रियेमुळे दररोज येथे मोठी वाहतूक कोंडी होते, ज्यामुळे रुग्णवाहिका, स्कूल बसेस आणि अत्यावश्यक सेवांना अडथळा निर्माण होतो आणि प्रवाशांचा वेळ वाया जातो.
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.