Fact Check: पाकिस्तान हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खरंच दादर चौपाटी बंद? मुंबई पोलीस म्हणतात...

Mumbai Police On Dadar Chowpatty:  दादर चौपटीसंदर्भातील अशाच व्हायरल मेसेजवर मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय. 

प्रविण दाभोळकर | Updated: May 9, 2025, 06:22 PM IST
Fact Check: पाकिस्तान हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खरंच दादर चौपाटी बंद? मुंबई पोलीस म्हणतात...
दादर चौपाटी

Mumbai Police On Dadar Chowpatty: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने 7 मे च्या रात्री पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले. त्यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले. खरतर हा हल्ला पाकिस्तानी सैनिक अथवा पाकिस्तानी नागरिकांवर नव्हता. तरीदेखील पाकिस्तानने भारताच्या सिमेलगत गावांवर हल्ले चढवले. यानंतर भारताकडूनही त्याला जशास तसे प्रत्युत्तर देण्यात आले. या पार्श्वभूमीवर अनेक खोटे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दादर चौपटीसंदर्भातील अशाच व्हायरल मेसेजवर मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय. 

Add Zee News as a Preferred Source

काय म्हणाले मुंबई पोलीस? 

मुंबई पोलिसांनी आपल्या सोशल मीडिया हॅंण्डलवरुन एक पोस्ट केलीय. ज्यामध्ये दादर चौपटीसंदर्भातील अलर्ट देण्यात आलाय. सध्या दादर चौपटी बंद असल्याचाबाबतचा एक मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. हा मेसेज बनावट असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटलंय. 

दादर चौपटी नेहमीप्रमाणे सुरु आहे. अधिकृत सरकारी वेबसाइट आणि माध्यमांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा, असे आवाहन मुंबई पोलिसांच्यावतीने करण्यात आलंय. सोशल मीडियातील फॉर्वर्डेड मेसेज, अनधिकृत ऑनलाइन सोर्समधून आलेल्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पुढे पाठवू नका, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलंय.

पाहा पोस्ट

पाकिस्तान हल्ल्यात मुंबईचा जवान शहीद 

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय सैन्य दलाचे 2 जवान शहीद झाले आहेत. यातील मुरली नाईक हे मुंबईतील घाटकोपरचे रहिवासी होते. ते मूळचे आंध्र प्रदेशचे होते. शहीद जवान मुरली नाईक यांना 9 मे 2025 रोजी पाकिस्तानशी लढताना वीरगती प्राप्त झाली. यानंतर संपूर्ण शहरावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. तसेच देशभरातून हळहळ व्यक्त केली जातेय. पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानशी लढताना भारतीय सैन्याचे दुसरे जवान दिनेश शर्मा यांनाही वीरमरण प्राप्त झाले. गोळीबारात जखमी झाल्यानंतर शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. मुरली नाईक यांना वीरगती प्राप्त झाल्यानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त केला जातोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद मुरली नाईक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More