लघु उद्योजकांशी अर्थमंत्री सीतारमण साधणार संवाद, मुंबईत होणार महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन

येत्या 16 सप्टेंबरला लघु उद्योग भारतीने मुंबईत महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन 2022 चे आयोजन केले आहे. ज्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन प्रमुख पाहुण्या असतील आणि एमएसएमई सदस्यांशी जीएसटी, वीज, एमएसएमई क्षेत्र, विकासात्मक घटक इ. विविध पैलूंवर संवाद साधतील.

Updated: Sep 14, 2022, 11:03 PM IST
 लघु उद्योजकांशी अर्थमंत्री सीतारमण साधणार संवाद, मुंबईत होणार महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन  title=

मुंबई - लघु उद्योग भारती (LUB) सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्राच्या उत्थान आणि बळकटीकरणावर लक्ष केंद्रित करून कार्य करत असते. येत्या 16 सप्टेंबरला लघु उद्योग भारतीने मुंबईत महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन 2022 चे आयोजन केले आहे. ज्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन प्रमुख पाहुण्या असतील आणि एमएसएमई सदस्यांशी जीएसटी, वीज, एमएसएमई क्षेत्र, विकासात्मक घटक इ. विविध पैलूंवर संवाद साधतील. तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड ही उपस्थित असतील. या कार्यक्रमा दरम्यान बँकींग एँड फायनान्स व एक्सपोर्ट वरील पुस्तकाचे प्रकाशन या दोघांच्या हस्ते होईल. 

या अधिवेशनाला 36 जिल्हे आणि 100 तालुक्यातील उद्योजक अधिवेशनासाठी येणार आहेत. केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या धोरणांवर लक्ष केंद्रित करून त्यांचा पाठपुरावा करणे हे या अधिवेशनामागचे प्रमुख कारण आहे. 

लघु उद्योग भारतीचे महाराष्ट्र राज्य महासचिव श्री भूषण मर्दे म्हणाले की, “भारत देशात एमएसएमई क्षेत्रात वाढ करण्याच्या भरपूर संधी आहेत. गेल्या २-३ वर्षांत कोविडने आपल्या देशाला आघात केल्यामुळे अनेक उद्योजकांना फटका बसला. आम्ही एमएसएमई क्षेत्र वगळून पुढील 3 वर्षांत 100% वाढ करणार आहोत. पारंपारिक एमएसएमई क्षेत्रासमोरील आव्हाने आणि समस्यांवर लक्ष केंद्रित करून आम्ही उद्योग धोरणावर काम करत आहोत जे लवकरच जाहीर केले जाणार आहे. आम्ही उद्योजकांना मार्गदर्शन प्रदान करू आणि विक्री वाढवण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी त्यांचा व्यवसाय स्थापित करण्यासाठी त्यांना प्रबोधन करू."

केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा उद्योजकांना संबोधित करतील.