मालकाने परदेशात पळ काढल्याने कर्मचारी हवालदिल
आता मेहुल चोक्सी याच्या गीतांजली ज्वेल्स कंपनीचे कर्मचारी हवालदिल झाले आहेत.
मुंबई : पीएनबी बँक घोटाळ्यासंदर्भात ईडी आणि सीबीआयकडून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या कार्यालयांवर कारवाई केल्यानंतर आता मेहुल चोक्सी याच्या गीतांजली ज्वेल्स कंपनीचे कर्मचारी हवालदिल झाले आहेत.
४०० कर्मचाऱ्यांचं आंदोलन
गीतांजली ज्वेल्स लिमिटेडच्या जवळपास 400 कर्मचाऱ्यांनी अंधेरी एमआयडीसीमधल्या गीतांजली ज्वेल्सच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं.
कंपनीच्या नावे असलेली खाती गोठवली
नीरव मोदीनं केलेल्या अपहाराप्रकरणी ईडीनं नीरव मोदीच्या कंपनीच्या नावे असलेली खाती गोठवली आहेत. यामध्ये सध्या तीस कोटींची शिल्लक आहे. तसंच जवळपास 14 कोटी किमतीचे शेअर्सही जप्त करण्यात आलेत.
स्टीलची 176 कपाटं आणि परदेशी घड्याळंही जप्त
या शोध मोहिमेदरम्यान ईडीनं स्टीलची 176 कपाटं आणि परदेशी घड्याळंही जप्त केली आहेत. मुंबई, दिल्ली, अलिबाग, सुरत, हैद्राबाद अशा विविध ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. त्यामध्ये ही सगळी मालमत्ता जप्त करण्यात आलीय.