Mumbai News : डिसेंबर (December 2022) महिना सुरु असल्याने राज्यात हुडहुडी (winter) भरली आहे. अशात अनेकांना सर्दी खोकल्याचा (Cold or cough) त्रास होतो. लहान मुलं असलेल्या प्रत्येक घरात कफ सिरप (Cough Syrup) असतं. तुम्ही जर लहान मुलांना डॉक्टर्सच्या (Doctor) सल्ल्याशिवाय कप सिरप देत असाल तर सावधान... ही बातमी नक्की वाचा...


मुलांना Cough Syrup देताय? मग सावधान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्दी किंवा खोकला झाल्यावर हमखास आपण मेडिकलमधून आणलेलं कफ सिरप लहान मुलांना देतो. पण थांबा असं करु नका, कारण मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अडीच वर्षांच्या मुलाला खोकला येतं असल्यामुळे त्याला कफ सिरप देण्यात आलं. पण त्यानंतर काही मिनिटांमध्ये चिमुरडा थंड पडायला लागला. एवढंच नाही तर चेहऱ्याचा रंगही निळसर झाला. हे पाहून घरांच्याचा पायाखालची जमीन सरकली. 


असा वाचला जीव


नशीबाने त्या चिमुरड्याचे आजोबा डॉक्टर असल्याने त्यांनी त्याला ताबडतोब सीपीआर दिला आणि पुढच्या उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे या बाळाचा जीव वाचला. ही धक्कादायक घटना मुंबईतील एका नामांकित डॉक्टराच्या नातवासोबत घडली आहे. या धक्कादायक घटनेनंतर घरच्याघरी आपल्या मनानेच बाळांना कफ सिरप देण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. (Giving Cough Syrup to Children Then carefully baby was given a cup of syrup and what happned mumbai news)



कफ सिरपबाबत डॉक्टर काय म्हणतात? पाहूयात..



कफ सिरपमुळे हृदयाचे ठोके वाढण्याची शक्यता


कप सिरपमुळे बाळांना सुस्ती येऊ शकते


खोकला कमी होत नसल्यास डॉक्टरकडे न्यावे


डॉक्टरच्या सल्ल्यानुसार बाळावर उपचार करावे


 


यापूर्वी असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. जागतिक आरोग्य संघटनेने भारतीय कंपन्यांचे चार कफ सिरप घातक घोषित केले होते. हे कफ सिरप हरियाणातील मेडेन फार्मास्युटिकल कंपनी बनवत असल्याचं समोर आलंय. 


डब्ल्यूएचओने म्हटलंय होतं की, हे सर्दी-खोकल्यावरील सिरप गॅम्बियामध्ये 66 मृत्यू आणि किडीच्या गंभीर समस्यांसाठी जबाबदार असू शकतात. त्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली. समोर आलेल्या अहवालानुसार, या सिरपमध्ये डाएथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकॉलची अयोग्य मात्रा असल्याची पुष्टी झाली आहे, जी माणसांसाठी अत्यंत धोकादायक आहेत.


 


CPR म्हणजे नेमकं काय असतं?


अनेकांना CPR म्हणजे काय हे माहिती नाही. तर अनेक वेळा चित्रपटात एखादा व्यक्ती बेशुद्ध पडला किंवा त्यावा हृदयविकाराचा झटका आळा तर त्याच्या छातीवर हाताने जोरात दाब दिला जातो. चित्रपटात तुम्ही पाहिलं असेल अभिनेत्री किंवा अभिनेता प्राण वाचविण्यासाठी तोंडाने श्वास देतात. या प्रक्रियाला सीपीआर असं म्हणतात.