सिद्धिविनायक मंदिरातल्या २ किलो ४२१ ग्रॅमच्या २६६ दागिन्यांचा लिलाव
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांना बाप्पाच्या दागिन्यांचा प्रसाद मिळालाय.
मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांना बाप्पाच्या दागिन्यांचा प्रसाद मिळालाय. मुंबईतलं सिद्धीविनायकाचं मंदिर हे गणेश भक्तांचं श्रद्धास्थान आहे. आणि याच सिद्धिविनायक मंदिरात भक्तांनी अर्पण केलेल्या लॉकेट, चेन, हार, छत्र मोदक आणि गणेशमूर्ती कॉइन अशा २ किलो ४२१ ग्रामच्या २६६ विविध प्रकारच्या दागिन्यांचा लिलाव करण्यात आला. यंदाच्या वर्षीचा हा तिसरा लिलाव होता. यातून जमा होणारी रक्कम समाजोपयोगी कामावर सिद्धिविनायक मंदिर न्यासातर्फे खर्च करण्यात येतो.