Gold Price Today 3 March Maharashtra Latest Gold Rate: धुळवडीच्या दिवशीच देशातील सोन्याच्या किमतीमध्ये किंचित घसरण झाल्याचं दिसत आहे. काल, म्हणजेच 2 मार्च रोजी मध्य पूर्वेत सुरु असलेल्या इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाली होती. मात्र आज त्यात थोडीशी घट झाली आहे. ही घसरण लक्षणीय नक्कीच नाही, मात्र दिलासा देणारी नक्की आहे. आज सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आज सोनं घेण्याची चांगली संधी आहे.
कालच्या तीव्र वाढीनंतर आज सोन्याच्या दरांमध्ये घसरण झाली आहे. पण काल सोन्याचे दर का वाढले होते? इस्रायल आणि अमेरिकेने 28 फेब्रुवारी रोजी इराणवर हवाई हल्ले केले. इराणने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने प्रत्युत्तर दिले. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्युच्या बातमीने तणाव आणखी वाढला. यामुळे जागतिक बाजारात भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि लोक सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळल्याने सोन्याची मागणी वाढली आणि दरांमध्ये उसळी दिसून आली. याच कारणामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये काल वाढ झाली असली तरी आज दिलासा मिळाला आहे.
मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1 लाख 70 हजार 650 रुपये इतकी आहे. राजधानी दिल्लीमध्येही सोन्याचा हाच दर आहे. कोलकाता आणि जयपूरमध्येही 24 कॅरेट सोने 1 लाख 70 हजार 650 रुपयांना आहे. चेन्नईमध्ये सोन्याचे दर इतर महानगरांपेक्षा थोडे अधिक आहेत. चेन्नईमध्ये प्रति तोळा सोन्यासाठी 1 लाख 70 हजार 830 रुपये मोजावे लागत आहेत. अहमदाबाद, भोपाळ, लखनऊ आणि चंदीगडसारख्या इतर अनेक शहरांमध्येही सोन्याची हीच किंमत आहे. फक्त हैदराबादमध्ये सोन्याचा दर चेन्नईसारखाच आहे. स्थानिक कर, उत्पादन शुल्क आणि इतर कारणांमुळे शहरांमध्ये सोन्याचे दर थोडेसे बदलतात. चेन्नईसारख्या काही ठिकाणी किमती थोड्या जास्त आहेत.
मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि जयपूरमध्ये 22 कॅरेटच्या एक तोळा सोन्यासाठी 1 लाख 56 हजार 290 रुपये मोजावे लागत आहेत. चेन्नई आणि हैदराबादमध्ये हाच दर 1 लाख 56 हजार 590 रुपये इतका आहे. इतर शहरांमध्ये एक तोळा सोन्याची सर्वसामान्य किंमत 1 लाख 56 हजार 290 रुपये आहेत. 18 कॅरेट सोन्याचे नेमके दर उपलब्ध नसले तरी ते साधारणपणे 24 आणि 22 कॅरेट सोन्यापेक्षा कमीच आहेत.
सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी ही घसरण फार काळ टिकणार नाही अस तज्ञांंचं म्हणणं आहे. इस्रायल-इराण संघर्ष दिर्घ काळ सुरु राहिला तर जागतिक बाजारपेठेमधील अनिश्चितता पुन्हा वाढेल. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुन्हा सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. होळीमुळे आज, 3 मार्च रोजी शेअर बाजार बंद आहे. एनएसई आणि बीएसईवरील व्यवहार बंद आहेत. काही राज्यांमधील बँकाना देखील सुट्टी आहे.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
BOT
(20 ov) 102/9
|
VS |
LES
96/8(20 ov)
|
| Botswana beat Lesotho by 6 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
UAE
(20 ov) 102/9
|
VS |
OMA
96/8(20 ov)
|
| Match Postponed | ||
| Full Scorecard → | ||
|
LES
(20 ov) 81/8
|
VS |
BOT
83/4(12.3 ov)
|
| Botswana beat Lesotho by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.