मुंबई : सोने आणि चांदीचा भाव मंगळवारी कमी झाला. सोने मंगळवारी १६२ रूपयांनी स्वस्त झालं, सोन्याचा भाव ४१ हजार २९४ रूपयांवर आला आहे. या आधी सोमवारी सोन्याच्या भावात १३३ रूपयांनी वाढ झाली होती. एचडीएफसी सिक्योरिटीजनुसार सोने मंगळवारी ४१ हजार ४५६ पर्यंत गेलं होतं.(१० ग्रॅम). चांदीही ६५७ रूपयांनी घसरून ४७ हजार ८७० रूपये किलोवर आली आहे. या आधी चांदीचा भाव ४८ हजार ५२७ रूपयांवर गेला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिक्के बनवणारे व्यावसायिक यांच्याकडून खरेदी कमी झाल्याने चांदीचा भाव घसरला असल्याचं सांगण्यात येत आहे. दिल्लीत २४ कॅरेट सोनं १६२ रूपयांनी खाली आलं आहे. 


या दरम्यान रूपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ११ पैसे मजबूत झाला आहे. काहींच्या मते कोरोना व्हायरसचा कहर वाढत असल्याने गुंतवणूकदार गुंतवणुकीवर वाईट परिणाम होईल का याचा विचार करून गुंतवणूक करीत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली आहे.