75 मिनिटांचे अंतर फक्त 25 मिनिटांत गाठता येणार; मुंबईतील महत्त्वकांक्षी प्रकल्प 'या' दिवशी खुला होणार?

Goregaon Mulund Link Road: गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्पाने वेग घेतला असून 16 मे 2026 पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे महानगरपालिकेचे उद्दिष्ट आहे.  

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 5, 2025, 10:02 AM IST
75 मिनिटांचे अंतर फक्त 25 मिनिटांत गाठता येणार; मुंबईतील महत्त्वकांक्षी प्रकल्प 'या' दिवशी खुला होणार?
Goregaon Mulund Link Road First Flyover Of The 12.2 Km Project To Open By May 2026

Goregaon Mulund Link Road: मुंबईकरांचा प्रवास सुकर आणि आरामदायी होण्यासाठी प्रशासनाकडून अनेक पर्यायांचा विचार केला जात आहे. मुंबई व उपनगरात अनेक प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले आहेत. मुंबई व ठाणे या दोन्ही शहरांत लोकसंख्या वाढत आहे. या दोन्ही शहरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. सध्या रेल्वे मार्गाने दोन्ही शहरे गाठता येतात. मात्र आता लवकरच मुंबईतून ठाण्याचा प्रवास सोप्पा होणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source

गोरेगाव ते मुलुंड या जोडरस्त्या प्रकल्पाने वेग घेतला आहे. 16 मे 2026पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी लवकरात लवकर या प्रकल्पाला गती द्यावी, असे आदेश दिले आहेत. तसेच, मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे – भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक त्या विविध परवानगी, ना-हरकत प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया वेगाने करावी. या प्रकल्पाच्या रस्ता रेषेने बाधित होणाऱ्या आवश्यक त्या जमिनींचे संपादन जलदगतीने करावे, अशाही सूचना त्यांनी केल्या

75 मिनिटांचे अंतर 25 मिनिटांत

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पामुळं 75 मिनिटांचे अंतर अवघ्या 25 मिनिटांत पूर्ण होणार आहे. मुंबईतील पूर्ण आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा चौथा प्रमुख जोडरस्ता आहे. हा जोडरस्ता 12.20 किमी या मार्ग असणार आहे. यामुळं पूर्व-पश्चिम उपनगराची वाहतूक सुरळीत होणार आहे. तसंच, वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. 

कसा असेल मार्ग?

गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्प एक चार टप्प्यात प्रस्तावित आहे. टप्पा 3 (अ) मध्ये उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोड बांधकामाचा समावेश आहे. या प्रकल्पांतर्गंत दिंडोशी-गोरेगाव, फिल्मसिटी दरम्याम सहापदरी उड्डाणपुल बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाची दोन टप्प्यात विभागणी करण्यात येणार असून गोरेगाव बाजू आणि मुलुंड बाजू असे दोन भाग आहेत. 

दिंडोशी न्यायालयापासून पुलाची सुरुवात होणार असून रत्नागिरी जंक्शन हॉटेल येथे 90 अंश कोनात उड्डाणपूल वळतो. तर फिल्मसिटी रोड येथे उतरतो. 

FAQ

प्रश्न १: गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प काय आहे आणि त्याचा उद्देश काय आहे?

उत्तर: हा प्रकल्प मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा चौथा प्रमुख जोडरस्ता आहे. १२.२० किमी लांबीचा हा मार्ग वाहतुकीची कोंडी कमी करेल आणि पूर्व-पश्चिम उपनगरांतील वाहतूक सुरळीत होईल. यामुळे मुंबईकरांचा प्रवास सोपा आणि विनाकोंडी होईल.

प्रश्न २: या प्रकल्पामुळे प्रवास वेळ किती कमी होईल?

उत्तर: सध्या ७५ मिनिटांचे गोरेगाव-मुलुंड अंतर अवघ्या २५ मिनिटांत पूर्ण होईल. यामुळे मुंबई आणि ठाण्यातील ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

प्रश्न ३: प्रकल्प कधी पूर्ण होईल आणि सद्यस्थिती काय आहे?

उत्तर: १६ मे २०२६ पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रकल्पाला गती देण्याचे आदेश दिले आहेत. हा प्रकल्प चार टप्प्यात विभागला असून, टप्पा ३ (अ) मध्ये उड्डाणपूल आणि एलिव्हेटेड रोडचे बांधकाम समाविष्ट आहे.

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More