राज्यातील 'या' शहरांत भीषण उष्णतेचा धोका; हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

देशातील अनेक राज्यात तापमान सतत वाढतंय

Updated: May 25, 2020, 07:46 PM IST
राज्यातील 'या' शहरांत भीषण उष्णतेचा धोका; हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी title=
संग्रहित फोटो

मुंबई : देशभरात उन्हाचा प्रकोप वाढतो आहे. देशातील अनेक राज्यात तापमान सतत वाढतंय. उन्हाळ्यातील हे वाढतं तापमान पाहता हवामान खात्याने महाराष्ट्रातील नागपूर शहरात पुढील काही दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. 

जम्मूमध्ये गरम हवा वाढत असल्याने लोकांच्या अडचणींमध्येही वाढ झाली आहे. येथे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पारा आणखी वाढला आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये पारा 46.7 डिग्री सेल्सियसवर पोहचला आहे. सलग दुसऱ्या दिवशी नागपूर महाराष्ट्रातील सर्वात उष्ण शहर ठरलं आहे. गरमीमुळे, उष्णतेमुळे नागपूरचे रस्ते निर्मनुष्य झाले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, नागपूर देशातील सर्वात उष्ण शहरांतील यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

नागपूर IMDचे उपमहासंचालक एमएल साहू यांनी सांगितलं की, या उन्हाळ्यातील हा सर्वात उष्ण दिवस असून सर्वात अधिक तापमान नागपूरात होतं. तर राजस्थानातील चुरमध्ये 47.4 डिग्री तापमान होतं. वाढत्या तापमानामुळे नागपूरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस नागपूर शहरात हाय अलर्ट असणार आहे.