`या` कारणाने भारतीय मुलांना लवकर करायचं असतं लग्न!
भारतीय तरूण लग्नासाठी जास्त वेळ पाहत नाहीत, कारण त्यांना असं वाटतं की त्यांच्या जीवनात भावनात्मक आणि आर्थिक स्थीरता येईल.
मुंबई: भारतीय तरूण लग्नासाठी जास्त वेळ पाहत नाहीत, कारण त्यांना असं वाटतं की त्यांच्या जीवनात भावनात्मक आणि आर्थिक स्थीरता येईल.
लग्नासंबंधी तरूणांचे विचार आणि भावना याचा शोध घेण्यासाठी केल्या गेलेल्या एका सर्व्हेत ही बाब समोर आली आहे. एका मॅच मेकींग वेबसाईट द्वारे करण्यात आलेल्या या सर्व्हेत १४ हजार ७०० प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
काय म्हणतो सर्व्हे?
या सर्व्हेत साधारण २०.५ टक्के पुरूष आणि २३.१ टक्के महिलांचे म्हणने आहे की, त्यांना लवकर लग्न करायचंय आणि लग्नासाठी ते जास्त वेळ थांबू शकत नाहीत. तेच यातील १२.२ टक्के पुरूष आणि १०.३ टक्के महिलांचं म्हणनं होतं की, लग्न त्यांच्यासाठी नाहीये.
तर १८.२ टक्के पुरूष आणि १३.२ टक्के महिलांचं म्हणनं होतं की, त्या याबाबतीत असंमजस आहे आणि कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीयेत. लग्नासाठी नाही म्हणणा-यांना याचं कारण विचारण्यात आलं तर त्यांनी सांगितले की, ते लग्नाची जबाबदारी घेऊ शकत नाहीत. काहींचं हेही म्हणनं होतं की, त्यांना लग्नावर विश्वास नाहीये. काही लोकांनी कमिटमेंटलाही कारण सांगितलं आहे. तेच याउलट लग्न करण्याची इच्छा असणा-यांचं म्हणनं होतं की, लग्नामुळे भावनात्मक स्थिरता येते. काही लोकांनी आर्थिक स्थिरता हेही कारण सांगितलं.