BMC fire security check : गोव्यातील दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने घेतला मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत थर्टी फस्ट आणइ न्यू ईयर सेलिब्रेशन पार्टी आयोजीत केल्या जातात. यावेळी अनेक हॉटेल्स पब आणि बार नियम मोडतात. यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. यामुळे आता नववर्षाच्या स्वागत समारंभांच्या पार्श्वभूमीवर 22 ते 28 डिसेंबर 2025 दरम्यान मुंबई अग्निशमन दलाने ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात सर्व हॉटेल्स्, रेस्टॉरंट, पब, बारची तपासणी केली जाणार आहे.
नववर्ष 2026 च्या स्वागतासाठी मुंबईतील अनेक हॉटेल्स्, आस्थापना, गृहसंकुल व इमारती, समुद्र किनाऱयावर व अन्य ठिकाणी कार्यक्रम, स्वागत सोहळ्यांचे आयोजन करण्यात येण्याची शक्यता आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येतात. या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षेबाबत अधिक खबरदारी घेणे आवश्यक असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलातर्फे दिनांक 22 डिसेंबर 2025 ते दिनांक 28 डिसेंबर 2025 दरम्यान ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेत आस्थापनांनी अग्निसुरक्षेबाबतच्या अटी व शर्ती यांचे अनुपालन केले नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 च्या तरतुदींनुसार कारवाई केली जाणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेत सर्व हॉटेल्स्, रेस्टॉरंट, पब, बारची तपासणी केली जाणार आहे. आपात्कालिन स्थितीसाठी लागणारी उपकरणांची तपासणी केली जाणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे जर आपात्कालिन स्थिती उद्भवली तर होणारे नुकसान कमी करण्यास फायदा होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची या मोहिमेवर नजर असणार आहे.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.