मुंबई : MHADA will build houses in Kamathipur : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज विधानभवनात मोठी घोषणा केली आहे. (Jitendra Awhad's big announcement) मुंबईतील कामाठीपुऱ्याचा विकास म्हाडा करणार आहे. याबाबतची माहिती आव्हाड यांनी दिली. आव्हाड यांनी यावेळी सांगितले की, कामाठीपुराच्या विकासाचे सर्व नियोजन झालेले असून लवकरच सर्व विकासकामांची सुरुवात होईल. त्याचवेळी ते म्हणाले, बीबीडी चाळ तयार झाल्यानंतर बाळासाहेब नगर, शरद पवार नगर आणि राजीव गांधी नगर, असं नामकरण केले जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या आमदारांचे मुंबईत घर नाही, त्यांना घर देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. विधानसभेत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही घोषणा केली आहे. या घरांसाठी प्लॉट बघितल्याचंही त्यांनी सांगितले. या योजनेतून 300 आमदारांना मुंबईत घरे मिळणार आहेत. मात्र म्हाडाच्या सोडतीमध्ये आमदारांसाठी कोटा असताना आणि अधिवेशनकाळात राहण्यासाठी आमदार निवासातील खोल्याही राखीव असताना पुन्हा हा घरांचा घाट का घातला जातोय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांनी मात्र या निर्णयाचं समर्थनच केले आहे.


गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाडांनी मुंबईतील कामाठीपुरा परिसराचा विकास करण्याची घोषणा विधानसभेत केली आहे. 27.91 एकर क्षेत्रासाठी म्हाडा नोडल एज्यन्सीच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. पुढील तीन महिन्यात परिसराचा पुर्नविकास केला जाईल अशी घोषणा आव्हाड यांनी केली आहे.


गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईतील हौसिंग संदर्भात चर्चा यावर उत्तर देतात ही माहिती दिली. कामाठीपूरा पुनर्विकास घोषणा करण्यात आली आहे. कामाठीपुरा हा दलदली भाग होता. ब्रिटिश लोकांनी कामाठी यांना येथे घर बांधून दिली होती. मुंबईतील अनेक जून्या इमारती कामाठी लोकांचा मोठे योगदान आहे.


27.91 एकर क्षेत्र कामाठी 33 (9) अंतर्गत म्हाडा नोडल एज्यन्सी माध्यमातून काम केले जाणार आहे. पुढील तीन महिन्यात पुर्नविकास केला जाईल, अशी माहिती आव्हाड यांनी दिली.