300 New Locals For Mumbai: मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मोदी सरकारने मुंबईकरांसाठी खास गिफ्ट दिले आहे. मुंबईमध्ये 300 नव्या लोकल ट्रेन्स दिल्या जाणार आहेत. तसेच वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल्स उभारले जाणार आहे. माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.
समृद्ध आणि विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल टाकत 3 मोठ्या परियोजनांना केंद्राने मंजुरी दिली आहे. पोर्ट कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासाठी पूर्वांचल ते मुंबईलला जोडण्यासाठी कॉरीडोर तयार करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेतील परेल, एलटीटी, कल्याण आणि पनवेल या टर्मिनल्सची क्षमता वाढवण्यात येणारा आहे.
रेल्वेने मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्थानकांची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जोगेश्वरीमध्ये नवी टर्मिनल्स आणि वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिलन्स उभारण्यात येणार आहे. मुंबई लोकल ट्रेन्समध्ये अतिरिक्त 300 ट्रेन्स जोडल्या जाणार आहेत.
मुंबई के लिए 300 नई लोकल ट्रेनें, वसई में मेगा रेल टर्मिनल!
धन्यवाद मा. प्रधानमंत्री मोदी जी और अश्विनी वैष्णव जी !समृद्ध एवं विकसित महाराष्ट्र की दिशा में रेलवे की तीन बड़ी परियोजनाओं को मंजूरी देकर जन एवं विकास हितैषी महत्वपूर्ण निर्णय लेने हेतु मा. प्रधानमंत्री नरेंद्र… pic.twitter.com/i3lxbK8F4B
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 29, 2024
या परियोजनांमुळे लाखो मुंबईकरांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर होणार आहे. यासोबतच एमएमआर रिजनमध्ये कनेक्टिव्हिटी, व्यापार वाढणार असल्याचे फडणवीस यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर म्हटले आहे.
महाराष्ट्र सरकारकडून लवकरच सर्व लोकलचे रुपांतर एसी लोकलमध्ये करण्यात येणार आहे. मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी प्रशासनाकडून हा प्रयत्न करण्यात येणार आहे. उन्हाळ्याच्या काळात लोकलमधील गर्दीमुळं प्रवाशांना खूप त्रास होतो. गर्दी आणि घामाच्या धाराने मुंबईकर हैराण होतात. एसी लोकलमुळं प्रवाशांचा त्रास वाचणार असून त्यांचा प्रवासही अधिक आरामदायी होणार आहे. एसी लोकलमुळं रेल्वेचे नेटवर्कमध्ये ही आधुनिकीकरण होईल. एसी लोकलमुळं प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील सुटेल. गर्दीमुळं व दरवाजात उभं राहिल्यामुळं अपघाताच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. धावत्या लोकलमधून होणारे प्रवाशांचे मृत्यू हा गंभीर प्रश्न होता. मात्र, एसी लोकलमुळं हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. एसी लोकलचे दरवाजे बंद असतात त्यामुळं नागरिकांचा प्रवास सुरक्षित होऊ शकतात. दरम्यान, मुंबई लोकलमधून दररोज 7.5 लाख नागरिक प्रवास करतात. जगातील सर्वात जास्त व्यस्त असलेले उपनगरीय रेल्वेचे जाळे आहे. मुंबईल लोकलचे जाळे 390 किमीपर्यंत पसरले आहेत. यात तिन प्रमुख मार्गिका आहेत. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्ग. या तिन्ही मार्गावर लोकल धावतात. पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांना वाढती मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे प्रशासनाने 27 नोव्हेंबरपासून 13 अतिरिक्त वातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या 96 वरून 109 वर पोहोचली आहे.
"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."
...Read More
LIVE|
WI
(10 ov) 32/2 (75 ov) 205
|
VS |
NZ
278/9(74.4 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 182/5
|
VS |
INA
104(18.5 ov)
|
| Philippines beat Indonesia by 78 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SIN
(20 ov) 156/8
|
VS |
THA
152/9(20 ov)
|
| Singapore beat Thailand by 4 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 145/9
|
VS |
SIN
131/6(20 ov)
|
| Philippines beat Singapore by 14 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.