Mumbai Job: ना परीक्षा, ना वयाची मर्यादा; मुंबई बंदर प्राधिकरणात थेट भरतीसाठी 'येथे' पाठवा अर्ज!

Mumbai Port Authority Job: मुंबई बंदर प्राधिकरणाने (MpA) नव्या पिढीतील युवकांसाठी नोकरीची संधी खुली केलीय. 

प्रविण दाभोळकर | Updated: Oct 14, 2025, 05:38 PM IST
Mumbai Job: ना परीक्षा, ना वयाची मर्यादा; मुंबई बंदर प्राधिकरणात थेट भरतीसाठी 'येथे' पाठवा अर्ज!
मुंबई प्राधिकरण नोकरी

Mumbai Port Authority Job: कामाचा अनुभव नाहीय आणि परीक्षाही द्यायची नाहीय तरी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. मुंबई बंदर प्राधिकरणाने (MpA) नव्या पिढीतील युवकांसाठी नोकरीची संधी खुली केलीय. यासंदर्भात अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्याक आलाय. 

Add Zee News as a Preferred Source

अनुभव नसलेल्या किंवा फ्रेशर पदवीधरांसाठी ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि संगणक ऑपरेटर व प्रोग्रामिंग सहाय्यक (COPA) पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आलीय. यात परीक्षा किंवा वयोमर्यादेचा बंधनकारक नियम नाही. हा 12 महिन्यांचा मोफत प्रशिक्षण कार्यक्रम सरकारी शिष्यवृत्तीसह उपलब्ध आहे. 

रिक्त पदांचा तपशील

MpA ने एकूण 116 जागा जाहीर केल्या आहेत, ज्यात 11 पदवीधर अप्रेंटिस आणि 105 COPA ट्रेड अप्रेंटिसचा समावेश आहे. हे पदे बंदराच्या दैनंदिन कामकाज, संगणकीय व्यवस्थापन आणि तांत्रिक क्षेत्रात कुशल कामगार तयार करण्यासाठी आहेत. यासंदर्भात अधिकृत अधिसूचना वेबसाइटवर उपलब्ध असून, निवड गुणवत्ता आधारे थेट होईल, ज्यामुळे स्पर्धा कमी होईल आणि योग्य उमेदवारांना प्राधान्य मिळेल.

पात्रता निकष

पदवीधर पदासाठी बीई, बीकॉम, बिबीससी, बिबीए किंवा बीसीएसारख्या कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. COPA साठी दहावी उत्तीर्ण आणि ट्रेड प्रमाणपत्र असावे. पूर्वी अप्रेंटिसशिप पूर्ण केलेल्यांना अपात्र ठरवले जाईल. वय 14 वर्षांपेक्षा जास्त असावे, पण 18 वर्षांखालीलांसाठी पालकांची संमती घेणे बंधनकारक असणार आहे. 

प्रशिक्षण

एक वर्ष कालावधीचे हे प्रशिक्षण शिकाऊ प्रशिक्षण केंद्रात (ATC) होईल, ज्यात सरकारी नियमांनुसार स्टायपेंड मिळेल. यामुळे उमेदवारांना बंदर व्यवस्थापनाचे व्यावहारिक ज्ञान मिळेल, जे भविष्यातील नोकरीसाठी पायाभूत ठरेल. मोफत असलेल्या या कार्यक्रमामुळे आर्थिक भार कमी होईल आणि कौशल्य विकासाला चालना मिळणार आहे.

अर्ज प्रक्रिया

अर्ज फॉर्म वेबसाइटवरून डाउनलोड करा, हाताने भरून आवश्यक कागदपत्रांसह (मार्कशीट, आधार, पॅन, जातप्रमाणपत्र इ.) ATC, भंडार भवन, माझगाव येथे पाठवा. ₹100 अर्ज शुल्क NEFT द्वारे भरावे लागेल. तारखेनंतरचे अर्ज नाकारले जातील, याची नोंद घ्या.

ऑफलाइन अर्ज प्रक्रिया 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत सुरू राहील. या उपक्रमामुळे बंदरातील कुशल मनुष्यबळ वाढून तरुणांना व्यावसायिक कौशल्ये मिळणार आहे. ही भरती बंदर क्षेत्रातील डिजिटल आणि तांत्रिक क्रांतीचा भाग आहे. अनुभव नसलेल्यांसाठी हा सोन्याचा धागा आहे, ज्यामुळे करिअरची सुरुवात मजबूत होईल. त्यामुळे इच्छुकांनी त्वरित अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

FAQ

प्रश्न: मुंबई बंदर प्राधिकरणाच्या अप्रेंटिसशिप भरतीसाठी कोण पात्र आहे?

उत्तर: ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (जसे की बीई, बी.कॉम, बीए, बीएससी, बीसीए) आवश्यक आहे. COPA अप्रेंटिससाठी दहावी उत्तीर्ण आणि COPA ट्रेड प्रमाणपत्र असावे. उमेदवारांचे वय किमान १४ वर्षे असावे, आणि १४-१८ वयोगटातील उमेदवारांसाठी पालकांची संमती आवश्यक आहे. यापूर्वी अप्रेंटिसशिप पूर्ण केलेले उमेदवार अपात्र ठरतील.

प्रश्न: या भरतीसाठी अर्ज कसा करावा आणि शेवटची तारीख काय आहे?

उत्तर: अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल. उमेदवारांनी मुंबई बंदर प्राधिकरणाच्या वेबसाइटवरून (mumbaiport.gov.in) अर्ज फॉर्म डाउनलोड करून, हाताने भरून आवश्यक कागदपत्रांसह (मार्कशीट, आधार, पॅन इ.) शिकाऊ प्रशिक्षण केंद्र, भंडार भवन, माझगाव, मुंबई-400010 येथे पाठवावा. अर्ज शुल्क ₹१०० NEFT द्वारे भरावे. अर्जाची अंतिम तारीख १० नोव्हेंबर २०२५ आहे.

प्रश्न: या अप्रेंटिसशिपचे फायदे काय आहेत आणि निवड प्रक्रिया कशी आहे?

उत्तर: या १२ महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना सरकारी नियमांनुसार स्टायपेंड मिळेल, तसेच बंदर व्यवस्थापनाचे व्यावहारिक कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित आहे, आणि कोणतीही लेखी किंवा मुलाखत परीक्षा होणार नाही. यामुळे नवख्या उमेदवारांना करिअर सुरू करण्याची उत्तम संधी आहे, विशेषतः ज्यांच्याकडे अनुभव नाही.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More