मुंबई : खार पोलीस स्थानक परिसरात झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज खार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. शिवसेनेच्या हल्लेखोर गुंडांवर कारवाई झाली पाहिजे अशी त्यांनी मागणी केली. तसंच खोट्या सहीनिशी पोलीस आयुक्त संजय पांडेंनी खोटी तक्रार नोंदवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरुन माझा FIR रजिस्टर करण्यास नकार दिला आहे. आज हे सिद्ध झालं आहे खार पोलीसांनी हे मान्य केलं आहे, की किरीट सोमय्या यांच्या नावावर सही नसलेला FIR मुंबई पोलीस आयुक्तांनी पाठवला होता. तो FIR अधिकृत करुन खार पोलिसांनी कारवाई सुरुवात केली होती असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.


मुंबई पोलीस आयुक्त कोणत्या प्रकारे चिटिंग करतात हे आज जनतेसमोर आलं आहे. जो FIR मीडियाला देण्या आला आहे त्या FIR वर किरीट सोमय्यांची सही नाहीए. त्यामुळे तो FIR कायदेशीर नाही, हे खार पोलिसांनी कबुल केलं आहे, खोटा FIR नोंदवणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात चौकशी होणं आवश्यक असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. 


मुंबई पोलीस आयुक्तांच्या देखरेखीखाली शिवसेनेच्या 70 ते 80 गुंडांनी माझ्यावर हल्ला केला होता, ते प्रकरण दाबण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या आदेशाने बांद्रा पोलीसांनी एक खोटा FIR रजिस्टर केला. तो खार पोलीस स्टेशनला पाठवण्यात आला, आज दोन तास खार पोलिसांनी मला बसवलं, FIR घेतो असं सांगितलं आणि नंतर मुंबई पोलीस आयुक्तांना फोन आला आणि ते सर्व कागदपत्र फाडून टाकले असं सोमय्या यांनी म्हटलंय.


पण मुंबई पोलिसांची माफियागिरी चालू देणार नाही. उद्धव ठाकरेंच्या गुंडांनी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी भाजपची लढाई सुरु रहाणार, उद्या १२.३० वाजता राज्यपालांना भेटणार आहोत, किरीट सोमय्यांची फेक FIR देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला ताबडतोब सस्पेंड केलं पाहिजे अशी मागणी सोमय्या यांनी केली.