)
BULDHANA : बुलढाण्यात पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे.... नवीन पाईपलाईन टाकण्याच्या नादात ठेकेदाराने जुनी पाईपलाईन फोडल्यामुळे नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.... यामुळे संतप्त झालेल्या माळ विहीर आणि वृंदावन नगरमधील महिलांनी थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात धाव घेत आक्रमक ठिय्या आंदोलन सुरू केले आहे..... महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.... ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या महिलांचा संयम सुटला .....
YEVLA : नाशिकच्या येवला तालुक्यातील बोकटे येथे गेल्या दहा वर्षांपासून आयुर्वेदिक चिकित्सलाच्या नावाखाली अॅलोपॅथी उपचार सुरू होते....लेबल नसलेले औषधे रुग्णांना दिली जात असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली....यानुसार आरोग्य विभागाने घातलेल्या छाप्यामध्ये लेबल नसलेल्या 20 ते 25 हजार गोळ्या, सलाईन , व सिरींज जप्त केल्या असून उपचार करत असलेला रॉय नावाचा बोगस डॉक्टर कारवाईनंतर नॉटटरीचेबल झाला आहे....दरम्यान आरोग्य विभागाकडून दवाखाना सील करण्यात आला......
NCP SP : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा 10 जून रोजी वर्धापनदिन साजरा केला जाणार आहे... यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे... पक्षाकडून ट्वीट करत कार्यकर्त्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय... पक्षाने केलेल्या ट्वीटमध्ये निर्णायक वर्धापनदिन असा उल्लेख करण्यात आलाय... यामुळे कोणती मोठी घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
KALYAN : कल्याणमधील चाकू हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केलीय... दुकान बंद करून जात असताना आरोपींनी दुकान मालकावर हल्ला केला... या हल्ल्यात उमेश सुरेश गंभीर जखमी झाले... पोलिसांनी घटनेचा करत आरोपींना 24 तासात अटक केली...
PIMPRI-CHINCHWAD : पुण्याच्या औंध मधील एका इन्शुरन्स कंपनीच्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्या तरुणीचा तिच्याच ऑफिस मधल्या बॉस ने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पिंपरी चिंचवड मध्ये पोस्टिंग असलेल्या या तरुणीने हिंजवडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली...त्यानंतर पोलिसांनी मोहम्मद उर्फ जाफर सय्यद या बॉसला अटक केलीय. मोहम्मद सय्यद इन्शुरन्स कंपनीतील तरुणीचा वारंवार विनय भंग करत होता.. तिच्याशी फोनवर कामा व्यतिरिक्त बोलून आणि तिला लोणावळ्यात जेवण करण्यासाठी घेऊन जाऊन तिचा विनयभंग केल्याच ही महिलेने आपल्या तक्रारीत नमूद केल आहे
VIDHAN PARISHAD ELECTION : विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघात चुरस वाढलीय. कारण शिवसेनेविरोधात निवडणूक रिंगणात उतरलेल्या भाजप बंडखोर गणेश गीते यांनी माघार घेण्यास नकार दिलाय. दुसरीकडं गोकुळ गीतेही निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळं नाशिकची निवडणूक तिरंगी होणार हे जवळपास स्पष्ट झालंय.
Thane : पुणे विषारी दारु पार्श्वभूमीवर ठाण्यात मोठी कारवाई करण्यात आली...ठाण्यातील अंजूर खाडी, देसईगाव खाडी आणि असीमघर खाडीत मोठी कारवाई केलीये...तब्बल १ कोटी रुपयांची गावठी दारु नष्ट करण्यात आलीये....पोखलेन लावून हातभट्टी उध्वस्त करण्यात आल्या.......
Abdul Sattar : दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत केलेल्या विधानावर शिंदेंनी अब्दुल सत्तार यांची कानउघडणी केली होती.. मात्र यानंतरही सत्तारांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या एकत्रिकरणावर भाष्य केलंय.. ठाकरे शिंदेंनी ठरवलं तर एकत्रिकरण होईल आणि हे दोन्ही नेते अंतिम निर्णय घेतील असं सत्तारांनी म्हटलंय.. महायुतीचा आपल्याला काहीही फायदा झाला नाही आणि नियोजनबद्धरित्या डावलल्यानं नाराजी बोलून दाखवली असं सत्तारांनी सांगितलं...
Abdul Sattar : ठाण्यात शिंदेंसोबत झालेल्या बैठकीनंतर झी 24 तासशी संवाद साधताना शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी मोठं वक्तव्य केलंय. महायुतीत सगळं आलबेल नाही, त्यामुळेच उघड नाराजी व्यक्त केली असं सत्तारांनी म्हटलंय.. या बेबनावाचे परिणाम आगामी निवडणुकीत भोगावे लागतील असा इशाराही सत्तारांनी दिलाय..
Delhi Fire : दिल्लीतील मालवीयनगरमध्ये भीषण आग...आगीत होरपळून 20 जणांचा मृत्यू...मालवीयनगरमधील रेस्टॉरंटला भीषण आग...आगीत 20 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
Mahayuti : कोकणातील महायुतीच्या सर्व आमदारांची काल रात्री मुंबईतल्या एक्सप्रेस टॅावरमध्ये बैठक संपन्न...सुनील तटकरे आणि उदय सामंत यांच्या उपस्थितीत विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक झाल्याची माहिती...या बैठकीत आमदार महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी हिने भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून खडाजंगी झाल्याची माहिती...परंतु अखेर बैठकीत जुईली दळवींचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती...उमेदवारी अर्ज मागे घेण्याची जबाबदारी विकास गोगावलेंवर दिली असून ते रत्नागिरीत पोहोचले आहेत. थोड्या वेळात उमेदवारी अर्ज मागे घेतला जाण्याची शक्यता
Nashik : नाशिकमधील धर्मांतर प्रकरण तपासात आंतरराष्ट्रीय आणि राजकीय धागेदोरे उघड झाले आहेत.... या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन निदा खानसह इतर संशयितांचा खटला आता जलदगती कोर्टात चालवला जाणारेय.... या प्रकरणी एसआयटीने ९ स्वतंत्र दोषारोपपत्रे दाखल केली आहेत.... लवकरच पुरवणी दोषारोपपत्र सादर करून खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी अर्ज दिला जाणारेय... देवळाली कॅम्प व मुंबई नाका ठाण्यात या संदर्भात नऊ वेगवेगळे गुन्हे दाखल झाले.... एसआयटीने आतापर्यंत निदा खानसह आठ संशयितांना अटक केली... तसेच, निदाला आश्रय देणारा नगरसेवक मतीन पटेल व घरमालक शेखला संशयित मानून गुन्हे दाखल करण्यात आलाय.....
Gujarat : साकीनाका पोलिसांनी गुजरातमध्ये एका भाड्याच्या घरात सुरू असलेला एमडी ड्रग्स निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला..... या कारवाईत तब्बल 74 कोटी 97 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलायं... ड्रग्ज माफियांच्या आंतरराज्य जाळ्याचा मोठा पर्दाफाश पोलिसांनी केलायं... अंधेरी घाटकोपर लिंक रोडवर पोलिसांनी सापळा रचून ओला उबेर चालवणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेतलं.... तिच्याकडून १०१ ग्रॅम एमडी जप्त केले.... प्राथमिक चौकशीत तिने हा माल मुंब्रा येथील एका व्यक्तीकडून घेतल्याची कबुली दिली.... यानंतर चौकशीत गुजरातमधील भाड्याच्या घरात मेफेड्रॉन निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची माहिती समोर आली....
BEST : धारावी पुनर्विकासासाठी बेस्टच्या दोन आगारांची जमीन हस्तांतरित केली जाणार आहे.. या जागेच्या बदल्यात अत्याधुनिक बस डेपो उभारले जाणार आहेत. धारावी आणि काळाकिल्ला आगारांच्या जागांचा यात समावेश आहे.. बेस्ट समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळालाय.. सध्या धारावी आणि काळाकिल्ला येथील बेस्ट आगारांचं सुमारे ११.५८ एकरांचं भूखंड आहेत... दरम्याननवीन आगारांमध्ये एकूण ४५० बस उभ्या करण्याची क्षमता असेल. बहुमजली स्वरूपातील या आगारांमध्ये तळमजल्यावर बस पार्किंगची व्यवस्था, तर वरच्या मजल्यांवर आगार प्रशासन, देखभाल आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नवीन आगार तयार होईपर्यंत बससेवा विस्कळीत होऊ नये यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी बस आगार उभारण्यात येणार आहेत.
Khan Sir : बिहारच्या पाटण्यामधील खान सर यांच्या कोचिंग सेंटर बाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. मुसल्लहपुर हाट परिसरात हल्लेखोरांनी 5 ते 6 राउंड फायर केले.. या गोळीबारात सुरक्षा रक्षक जखमी झालाय.. तसेच खान सरांचे पोस्टर्स आणि बॅनर्स देखील फाडण्यात आलेत.. 2 कोचिंग सेंटरमधील व्यावसायिक वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
Ashok Kharat Case : महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे चर्चेत असलेला अशोक खरात याला सिन्नर पोलिसांची कोठडी संपल्यानंतर काल संध्याकाळी पुन्हा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले. त्याचा पुढील ताबा नाशिकमधील सरकारवाडा पोलिस घेणार आहे. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात पुढील चौकशीची आवश्यकता नसल्याचे ईडीनं न्यायालयात स्पष्ट केल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती....खरातची पत्नी संशयित कल्पना खरातचा तपास गेल्या दोन महिन्यांपासून पोलिस घेत असून, अद्यापही ती हाती लागलेली नाही. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, गेल्या आठ वर्षात तिच्या विविध बँक खात्यांमधून सुमारे सात कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.यापूर्वी देखील खरात नाशिकरोड कारागृहातच होता. तेथून त्याला शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर तो सिन्नर पोलिसांच्या ताब्यात होता. आता मंगळवारी त्याला पुन्हा नाशिकरोड कारागृहात हलविण्यात आले...
Delhi : उत्तर दिल्लीतील मुकुंदपूर भागात घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला..... या स्फोटामुळे भांडी रंगवणाऱ्या एका कारखान्याची एक मजली इमारत कोसळली.... या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ११ कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी एका महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे...... व्यावसायिक एलपीजी सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे....
Pune : पुणे विषारी दारूप्रकरणी CIDच्या कारवाईला वेग...आतापर्यंत 6 जणांना CID कोठडी...विषारी दारुप्रकरणी तपासात 10 टीम कार्यरत...पुरावे गोळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु
Mahayuti : विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या डोक्याला बंडखोरांचा ताप कायम आहे. पाच मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघात बंडखोर अजूनही रिंगणात आहेत. संभाजीनगर मतदारसंघात समीर सत्तार नाशिकमध्ये भाजपचे गणेश गिते आणि रायगडात जुईली दळवी या रिंगणात कायम आहेत. या तीनही मतदारसंघातील बंडखोरांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरुच आहेत. पुण्यात राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरेंच्या बंडोबाचा थंडोबा झालाय. तर अमरावतीत शिवसेना बंडखोर विप्लव बाजोरियांचा अर्ज बाद झालाय.
Mahayuti : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील बंडखोरी शमवण्यासाठी आता वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग आलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि शिवसेना नेते उदय सामंत आज दुपारी 12 वाजता एक संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत.. या परिषदेतून महायुतीची अधिकृत भूमिका स्पष्ट केली जाणार आहे..बंडखोरांना कडक शब्दांत इशारा दिला जाण्याची शक्यता आहे.. महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात शड्डू ठोकणाऱ्या बंडखोरांशी नेत्यांनी संपर्क साधण्यास सुरुवात केलीय.. दिलेल्या मुदतीत उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास पक्षातर्फे थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आक्रमक पवित्रा महायुतीने घेतला असून या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागलंय..