Maharashtra Corona Update : राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ, एकूण पॉझिटिव्ह किती?

Maharashtra Corona Update : राज्यासह मुंबईत दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ होतेय.

Updated: Jun 3, 2022, 08:15 PM IST
Maharashtra Corona Update : राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ, एकूण पॉझिटिव्ह किती?  title=

मुंबई : कोरोनाचा जोर गेल्या काही महिन्यात ओसरला होता. मात्र आता राज्यासह मुंबईत दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ होतेय. राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा (Maharashtra Corona Update) हा 1100 पार गेला आहे. तर मुंबईतील रुग्णसंख्याही वाढली आहे. तर 500 पेक्षा अधिक जणांना कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. (maharashtra corona update 3 june 2022 today 1 thousand 134 patients found in state know positivity rate)

राज्यात दिवसभरात किती रुग्ण? 

राज्यात आज (3 जून) 1 हजार 134 रुग्णांचं निदान झालं आहे. तर मुंबईत 763 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. दिवसभरात  563 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

मुंबईत सर्वाधिक अ‍ॅक्टीव्ह रुग्ण 

दरम्यान राज्यत सर्वाधिक रुग्ण हे मुंबईमध्ये आहेत. मुंबईत कोरोनाचे 3 हजार 735 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईनंतर ठाण्यात 658, पुण्यात 409 तर रायगडमध्ये 108 रुग्ण कोरोनाशी झुंज देतायत.