Maharashtra Politics : सेना-ठाकरे (Shinde Group vs Thackeray Group) गटामध्ये आता दसरा मेळाव्यावरून (Dussehra Rally) मोठा वाद रंगला आहे. शिंदे आणि ठाकरे गटाने शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही गटातील नेते शिवाजी पार्कवर आमचा मेळावा होणार असल्याचा दावा करत असले तरी आता मोठी बातमी समोर आली आहे. कायदा सुव्यवस्थेचा विचार करता शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर (BKC Stadium) होणार असल्याची माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या बैठकीत निर्णय


दसरा मेळाव्याबाबत शिंदे गटाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत दसरा मेळाव्याची रुपरेषा ठरवली जाणार असून कोणाकडे कोणती जबाबदारी असणार हे देखील ठरवलं जाण्याची शक्यता आहे. दसरा मेळाव्यात कोणत्या मान्यवरांना बोलावयाचं याची यादीही तयार केली जाणार आहे. तसंच आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्याबरोबर झालेला प्रकार वारंवार होऊ शकतात,त्यावर काय भूमिका घ्यायची यावर देखील आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.


राज ठाकरे प्रमुख पाहुणे
दरम्यान, शिंदे गटाच्या (Eknath Shinde Group) दसरा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर राज ठाकरे मेळाव्याला उपस्थित राहिले तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही असं विधान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी केलं होतं.


दसरा मेळावा शिवतीर्थावरच - उद्धव ठाकरे
शिवसेनेचा मेळावा शिवतीर्थावरच होणार असा निर्धार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. दसरा मेळाव्याबाबत कोणताही संभ्रम नाही. ज्यांना संभ्रम करायचा त्यांना करू दे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. सेनेला 56 वर्षे झालीत,असे किती 56 आले गेले तरी आम्हाला फरक पडत नाही. शिवसेना ही शिवसैनिकांच्या रक्ताने मोठी झाली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.