अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीच्या भावाचा मुख्यमंत्र्यांच्या पक्षात प्रवेश; माजी नगरसेविकेचाही समावेश

Maharashtra Politics : अरुण गवळी याच्या भावासोबत माजी नगरसेविका वंदना गवळी यांनी कार्यकर्त्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे

Updated: Feb 26, 2023, 03:34 PM IST
अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीच्या भावाचा मुख्यमंत्र्यांच्या पक्षात प्रवेश; माजी नगरसेविकेचाही समावेश title=

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात सत्तातर मोठं सत्तांतर घडून आलय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या (BJP) मदतीने राज्यात सत्ता स्थापन केलीय. त्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shiv Sena) अनेकजण प्रवेश करत आहेत. आता अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीचा (arun gawli) भाऊ प्रदीप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी यांनी कार्यकर्त्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

भायखळ्याच्या माजी नगरसेविका वंदना गवळी आणि प्रदीप गवळी यांच्यासोबत अखिल भारतीय सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

"मुंबईतील भायखळा परिसरातील माजी नगरसेविका वंदना गवळी आणि प्रदीप गवळी यांच्यासह अखिल भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यासोबतच ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर विभागातील सेंचुरी रेयॉन कंपनीतील कर्मचाऱ्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. या सगळ्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.