मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनपासून बंद असलेली मेट्रो सेवा 15 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. राज्यात मिशन बिगेन अगेन अंतर्गत सरकारने आणखी एक दिलासा दिला आहे. मुंबई मेट्रो सुरु करण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात त्रास कमी होणार आहे. मेट्रो सेवा सुरु करण्याबाबतची नियमावली लवकरच जारी करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- मेट्रोसह दुकानं उघडी ठेवण्याच्या वेळेत 2 तासांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत दुकाने उघडी राहू शकतात.


- सर्व शासकीय आणि खाजगी लायब्ररी उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतू सामाजिक अंतर आणि स्वच्छताविषयक नियमांचे अनुसरण करणे आवश्यक असणार आहे.


- संशोधनासाठी प्रयोगशाळा, पीएचडी आणि पोस्ट ग्रॅज्युएट सायन्स कोर्स विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल सुरू करण्याची परवानगी.


- शाळा व महाविद्यालये सध्या बंदच राहणार आहेत.


- 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा तर अंत्यसंस्काराला 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे.


- बिजनेस टु बिजनेस एक्जिबिशनला परवानगी देण्यात आली आहे.


- स्थानिक साप्ताहिक बाजार उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.