)
Mhada Lottery Homes: सर्वसामान्यांना आजकाल मुंबईत घर घेणे परवडेनासे झाले आहे. त्यामुळं अनेक जण म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहत असतात. नागरिकांना परवडणाऱ्या दरात म्हाडा घरे उपलब्ध करुन देत असतात. मात्र म्हाडाच्या घरांसाठी काही अटीही घालण्यात येतात. म्हाडाच्या घराचा ताबा मिळाल्यानंतर पुढील पाच वर्षे घर विकता येत नाही. मात्र आता ही अट शिथिल होण्याची शक्यता आहे.
म्हाडाच्या घराचा ताबा मिळाल्यानंतर पुढील पाच वर्षे घर न विकण्याची अट लवकरच काढून टाकण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने म्हाडाकडून हालचाली सुरू आहेत. एकदा का ही अट शिथील झाली तर घरमालकाला कधीही घर विकण्याची मुभा मिळणार आहे. सध्या म्हाडाकडून हा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास म्हाडाची घरे घेऊन ती तात्काळ विकली जाण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला म्हाडाचे घर 10 वर्षे विकता येत नव्हते. मात्र तरीही बेकायदेशीररित्या घरे विकली जात होती. तेव्हा म्हाडाने ही 10 वर्षांची अट कमी करत 5 वर्षांची केली. सध्या म्हाडाचे घर लागलेल्या अर्जदाराला 5 वर्षानंतर घर विकण्याची परवानगी आहे. मात्र तरीही बेकायदेशीररित्या घरे विकली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळं आता म्हाडाकडून ही अटच रद्द करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र पाच वर्षांची ही अट रद्द केल्यानंतर म्हाडाचा सर्वसामान्यांना घरे देण्याचा मुळ उद्देशच सफल होणार नाही, अशी चर्चाही केली जात आहे.
गृहनिर्माण विभागाच्या आदेशानुसार म्हाडाकडून हा प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्यानंतर हा प्रस्ताव प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसंच, या प्रस्तावामुळं म्हाडाच्या मुळ उद्देशाला कुठेही धोका पोहोचणार नाही, याचाही विचार केला जाणार असल्याचे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
उत्तर: मुंबईत घर घेणे परवडेनासे झाल्याने अनेक जण म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहतात. म्हाडा नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देते, ज्यामुळे सामान्य लोकांना घर मिळण्याची संधी मिळते.
उत्तर: म्हाडाच्या घराचा ताबा मिळाल्यानंतर पुढील पाच वर्षे घर विकता येत नाही. ही अट सध्या लागू आहे आणि ती लॉटरी विजेत्यांसाठी बंधनकारक आहे.
उत्तर: होय, ही अट लवकरच काढून टाकण्याची शक्यता आहे. म्हाडाकडून या दृष्टीने हालचाली सुरू आहेत आणि प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.