'औकात आहे का?', राज-उद्धव यांना स्वामी आनंद स्वरूपांचं आव्हान; 'मी मुंबईत येतोय, हिंमत असेल तर समोर येऊन..'

Raj Thackeray Uddhav Thackeray Challenged: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं थेट नाव घेत या दोघांच्या छोट्या छोट्या टोळ्या असून ते सत्तेपासून दूर असल्याचंही म्हटलंय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 5, 2025, 12:03 PM IST
'औकात आहे का?', राज-उद्धव यांना स्वामी आनंद स्वरूपांचं आव्हान; 'मी मुंबईत येतोय, हिंमत असेल तर समोर येऊन..'
ठाकरेंवर थेट हल्लाबोल

Raj Thackeray Uddhav Thackeray Challenged: राज्यातील मराठी विरुद्ध हिंदी वाद पुन्हा चांगलाच तापला आहे. हिंदी भाषेचा इयत्ता पहिलीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमापासून समावेश करण्याच्या मुद्द्यावरुन सुरु झालेल्या या वादामधून काही वर्षांपूर्वीची स्थिती पुन्हा राज्यात निर्माण झाली आहे. मिरारोड असो किंवा राज्यातील इतर भागांमध्येही काही ठिकाणी मराठीच्या मुद्द्यावरुन परप्रांतियांना मनसे स्टाइल दणका देण्यात आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. अशातच पुन्हा एकदा स्थानिक विरुद्ध परप्रांतीय असा वाद सुरु झाला आहे. अशातच उत्तर प्रदेशमधील काली सेनेचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरुप यांनी ठाकरे बंधुंना थेट हात तोडून ठेवण्याची धमकी दिली आहे. (ठाकरेंच्या मेळाव्याचे लाइव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोण आहे राज आणि उद्धव यांच्यावर टीका करणारे आनंद स्वरूप?

राज ठाकरेंना यापूर्वीच मुंबईमधील उद्योजक सुशील केडिया यांनी आव्हान दिलेलं असतानाच आता शांभवी पीठाधीश्वर स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनी ठाकरे बंधूंना आव्हान दिलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हजारो किलोमीटर दूर रोजगार मिळवण्यासाठी गेलेल्यांना मारहाण करतात हे फार भीत्रेपणाचं लक्षण आहे, असं आनंद स्वरूप यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना आनंद स्वरूप यांनी कठोर शब्दांमध्ये ठाकरे बंधूंवर टिका करताना थेट औकात असा उल्लेख करत टीका केली आहे.

नक्की पाहा हे फोटो >> 3103 कोटींचा मालक आहे राज ठाकरेंना नडणारा Sushil Kedia; त्याचा नेमका उद्योग काय? एवढी संपत्ती कशी कमवली?

ठाकरेंच्या दोन छोट्या छोट्या टोळ्या...

आनंद स्वरूप यांनी 'टाइम्स नाऊ हिंदी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्रातील सध्य स्थितीबद्दल भाष्य केलं आहे. "सध्या महाराष्ट्रात तुम्ही पाहत असाल की कशाप्रकारे राका आणि शाका हे दोघे भाऊ म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या दोन छोट्या छोट्या टोळ्या आहेत. ज्या आता सत्तेतही नाहीत. त्यांची काय हिंमत आहे की त्यांनी मुस्लिमांना सांगावं की अजान तुम्ही अरबीमध्ये देऊ नका, मराठीत द्या!" अशी टीका आनंद स्वरूप यांनी केली आहे.

नक्की वाचा >> राज ठाकरे- उद्धव ठाकरेंमध्ये वयाचं अंतर किती? यावर आकडेवारीवर तुमचा विश्वास बसणं कठीण

तुमची औकात असेल तर समोर येऊन...

ठाकरे बंधुंवर निशाणा साधताना, "त्यांची औकात आहे का मुस्लिमांबद्दल बोलण्याची. हजारो किलोमीटर दूरवर जाऊन महाराष्ट्रात आपली उपजीविका चालवणाऱ्या भोळ्याभाळ्या कामगारांना एकटं पाहून त्यांना हे कानाखाली मारतात. त्यांना त्रास देणं हे फार भित्रेपणाचं लक्षण आहे. तुमची हिंमत असेल तर मी येतोय. मी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि राऊतांच्या टोळीला आव्हान देतोय की मी महाराष्ट्रात येतोय. तुमची औकात असेल तर समोर येऊन दाखवा. मला हात लावून दाखवा. तुमचा हात वेगळा केला नाही तर माझं नाव बदलून टाका," असं खुलं आव्हान आनंद स्वरूप यांनी ठाकरे बंधुंना दिलं आहे.