Mumbai Crime : गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईला हादरुन सोडणाऱ्या घटना समोर येत आहे. बापासह दोन भावांसह चौघांनी तब्बल 11 महिने लैंगिक अत्याचार केला. ही घटना ताजी असताना मुंबईतील शिवडी परिसरातून अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 16 वर्षीय मुलीवर तिच्या जन्मदात्याने बलात्कार केला. एवढंच नाही तर बहिणीच्या नवऱ्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केलाचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात भाऊजीला अटक केली असून वडील मात्र फरार आहे.
मुंबईतील शिवडी परिसरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांनी बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीवरून मुंबईतील शिवडी पोलीस ठाण्यात आरोपी वडील आणि भावोजीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवडी पोलिसांनी मेहुण्याला अटक केली आणि वडिलांचा शोध सुरू केला.
पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असं म्हटलं आहे की, पीडिता घरी झोपली असताना तिच्या वडिलांनी तिचा चेहरा कापडाने झाकून तिच्यावर बलात्कार केला. तसंच तिने घटनेची माहिती दिल्यास तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडिता इतकी घाबरली होती की ती काहीही बोलू शकली नाही.
या घटनेच्या काही दिवसांनंतर, या वर्षी मार्चमध्ये, पीडिता घरी एकटी झोपली असताना, तिच्या भावोजीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर, पीडितेने काल जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आणि भावोजीला अटक केली. फरार वडिलांचा शोध सुरू आहे.
महिला, तरुणी या देशातील खरोखरच सुरक्षित आहे का? असे अनेकांनी प्रश्न उपस्थितीत होत आहेत. महिला, तरुणी समाजातच नाही, तर आता आपल्याच कुटुंबात सुरक्षित आहे का? असा प्रश्न मनाला भेडसावून सोडत आहे.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
CSK
(20 ov) 212/2
|
VS |
DC
189(20 ov)
|
| Chennai Super Kings beat Delhi Capitals by 23 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SRH
(20 ov) 219/6
|
VS |
PBKS
223/4(18.5 ov)
|
| Punjab Kings beat Sunrisers Hyderabad by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 201/8
|
VS |
RR
202/4(18 ov)
|
| Rajasthan Royals beat Royal Challengers Bengaluru by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.