मुंबई: कोकणात झालेल्य़ा मुसळधार पावसामुळे चिपळून आणि महाडमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या दोन्ही जिल्ह्यात अनेकांना मदतीचा हात देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. महाडमध्ये तळीये गावं भूस्खलनात गेलं. तर महाडमध्ये अनेक गावांमध्ये पाण्यामुळे नुकसान झालं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये महाडमधील नागरिकांना मदत करण्यासाठी 4 चिमुकले हात म्हणजेच 2 विद्यार्थी पुढे सरसावले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील शाळेतील 2 विद्यार्थ्यांनीही या मदतीसाठी आपला खारीचा वाटा उचलण्याचा निर्णय घेतला. दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या मित्र-परिवाराकडून काही फंड जमा करून महाडमध्ये नागरिकांना मदत केली आहे. त्यांच्या या कामगिरीचं खूप कौतुक होत आहे. सिंगापूर इंटरनॅशनल स्कूर मध्ये शिकणाऱ्या युवान रघुपती आणि जमनाबाई नर्सी इंटरनॅशनल स्कूरमधील टीया शर्मा असं या दोन्ही विद्यार्थ्यांची नावं आहेत. त्यांनी फंड गोळ्या करून त्यातून आवश्यक त्या वस्तू घेऊन महाडमधील नागरिकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. 



गॅस शेगडी, पाण्यासाठी फिल्टर अशा गरजेच्या वस्तू महाडमधील नागरिकांपर्यंत पोहोचवल्यानं तिथल्या नागरिकांनी या दोन्ही विद्यार्थ्यांचं तोंड भरून कौतुक केलं आणि आभारही मानले. युवानला जेव्हा विचारलं की तुला ही कल्पना कशी सुचली त्यावर युवाननं फार सुंदर उत्तर दिलं आहे. 


युवान म्हणाला की माझ्या बाबांकडे काम करणारा आमचा ड्रायव्हर महाडचा आहे. त्याचं नाव अमित वाघे. त्याने महाडमधील परिस्थिती आम्हाला सांगितली. त्याचं घर 12 फूट पाण्याखाली होतं. त्याचं कुटुंब मदतीसाठी रात्रभर घराच्या छतावर राहिलं होतं. पुराचं पाणी ओसरल्यानंतर त्याच्या घरात सगळा चिखल होता. तिथली परिस्थिती खूप गंभीर होती. 



टीया म्हणाली की अजूनही परिस्थिती तितकीच गंभीर आहे. तिथल्या अनेक घरांमध्ये पिण्यायोग्य पाणी नाही. त्यांच्याकडे गॅस नाहीय अशा अवश्यक असणाऱ्या गोष्टी त्यांनी गोळा करून तिथल्या नागरिकांपर्यं पोहोचवल्या. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. 



या दोघांनी मिळून लोकांकडून आणि डिजिटली अशा दोन्ही स्वरुपात फंड गोळा केला. ही मदत ज्यावेळी तिथल्या लोकांपर्यंत पोहोचली त्यावेळी तिथल्या लोकांच्या डोळ्यात अश्रूही होते. त्यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानले आणि त्यांचं कौतुकही केलं.